उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता, शोधमोहीम सुरू

उत्तराखंडमध्ये पुन्हा हिमस्खलन झाल्याची घटना समोर येत आहे.
उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता, शोधमोहीम सुरू
उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता, शोधमोहीम सुरूSaam Tv
Published On

रश्मी पुराणिक

उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये पुन्हा हिमस्खलन Avalanche in Uttarakhand झाल्याची घटना समोर येत आहे. धक्कादायक मुंबईतून गिर्यारोहणासाठी गेलेले पाच जण बेपत्ता झाले आहेत. माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहण करत असताना ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

या हिमस्खलनात भारतीय नौदलाचे १० जवान बेपत्ता झाले आहेत. सध्या त्यांचे शोध घेण्याचे कार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे २० जवान गिर्यारोहण करण्यासाठी माऊंट त्रिशूलवर गेले होते आणि मात्र वाटेतच हा अपघात झाला आहे. सध्या वेगानं शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती रेस्क्यू ऑपरेशन टीम उत्तरकाशीहून माऊंट त्रिशूलच्या दिशेनं रवाना झाली आहे.

ही २० जणांची टीम ७,१२० मीटर उंच माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी गेली होती. हेलिकॉप्टर, लष्कर, हवाई दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRF आणि ग्राउंड रेस्क्यू टीम सध्या शोध मोहिम करत आहे.

उत्तराखंडमध्ये हिमस्खलन; भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता, शोधमोहीम सुरू
पैठणमध्ये ढगफुटी; पुरात अडकलेल्या बाळ आणि बाळंतिणीला ग्रामस्थांनी वाचवले

वृत्तसंस्थेनुसार, शुक्रवारी सकाळी गिर्यारोहण करण्यासाठी ही टीम माऊंटसाठी पुढे निघाली. त्याच या दरम्यान हिमस्खलन झाले. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे प्राचार्य अमित बिष्ट यांनी माहिती दिली की, ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com