मुंबई : विविध सणं ऑगस्ट August महिन्यात असल्याने, सार्वजनिक सुट्ट्यांची Holidays रेलचेल दिसून आली आहे. जास्त प्रमाणात येत असलेल्या, सार्वजनिक सुट्ट्यांचा परिणाम बँकांच्या Bank कामकाजावर होताना आपल्याला दिसून येणार आहे. शनिवार Saturday, रविवारी Sunday हे आठवड्याच्या सुट्ट्या आणि इतर सार्वजनिक सुट्ट्यांने ऑगस्ट मध्ये अर्धा महिना बँकेचे कामकाज बंद राहणार आहेत.
हे देखील पहा-
ऑगस्ट महिन्यामध्ये शनिवार आणि रविवार त्याचबरोबर इतर सुट्ट्या एकत्र असल्याने, देशामधील विविध भागांत १५ दिवस बँका बंदच राहणार आहेत. ऑगस्ट महिन्याची सुरुवात रविवारने होत आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी आठवड्याच्या सुट्ट्या एकत्र करून, एकूण ७ सुट्ट्या असणार आहेत. १ ऑगस्ट नंतर ८, १५ व २२ आणि २९ ऑगस्ट या दिवशी रविवारची सुट्टी येत आहे. तसेच १४ आणि २८ ऑगस्ट या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका बंद असणार आहेत. तसेच इतर काही सणांच्या सुट्ट्या देखील बँकांना मिळणार आहेत. या सुट्ट्यांची यादी आपल्याला पुढीलप्रमाणे बघायला मिळेल.
ऑगस्टमधील सुट्ट्यांची यादी पहा-
१) १ ऑगस्ट - रविवार
२) ८ ऑगस्ट - रविवार
३) १३ ऑगस्ट -पॅट्रिएट डे (इंफाळमध्ये बँका बंद)
४) १४ ऑगस्ट - दुसरा शनिार
५) १५ ऑगस्ट - रविवार
६) १६ ऑगस्ट - पारशी नववर्ष
७) १९ ऑगस्ट - मोहरम
८) २० ऑगस्ट - फर्स्ट ओणम
९) २१ ऑगस्ट- थिरुवोणम - (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
१०) २२ ऑगस्ट - रविवार
११) २३ ऑगस्ट श्री नारायण गुरू जयंत (कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद)
१२) २८ ऑगस्ट - चौथा शनिवार
१३) २९ ऑगस्ट - रविवार
१४) ३० ऑगस्ट जन्माष्टमी
१५) ३१ ऑगस्ट - गोपाळ काला
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.