Boat Sink in Sea : बोट बुडून ६०हून अधिक नागरिकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता, केप वर्डे बेटाजवळील घटना

Boat Accident : गलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही बोट 10 जुलै रोजी सेनेगलच्या फासे बॉय येथून निघाली होती, ज्यामध्ये 101 प्रवासी होते.
Sea
SeaSaam tV
Published On

Boat Accident : पश्चिम आफ्रिकेत एक भीषण बोट अपघाताची घटना समोर आली आहे. केप वर्डे बेटांच्या किनार्‍याजवळ सेनेगलमधून स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट समुद्रात बुडाली आहे. या दुर्घटनेत 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने बुधवारी ही माहिती दिली. IOM ने सांगितले की, पश्चिम आफ्रिकेतील केप वर्डे बेटांजवळ सेनेगलमधील स्थलांतरित बोट बुडाल्याने 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

IOMच्या प्रवक्त्यांनी यांनी सांगितले की, 63 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात यश आले आहे. यामध्ये 12 ते 16 वयोगटातील चार मुलांचा समावेश आहे.(Maharashtra News)

Sea
Kalyan Crime News : अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर घटनास्थळी घडला थरार, तरुणावर गुन्हा दाखल

'पिरोग' नावाची लाकडी मासेमारी बोट सोमवारी अटलांटिक महासागरात, सालच्या केप व्हर्डियन बेटापासून सुमारे 150 नॉटिकल मैल (277 किलोमीटर) अंतरावर दिसली होती. स्पॅनिश मासेमारी जहाज ज्याने ती बोट पाहिली. त्यानंतर केप वर्डियन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. (Latest News)

Sea
UP Crime news: तरुणीला घरातून शेतात पळवून नेलं; अत्याचाराचा व्हिडीओ व्हायरल, संतापजनक घटनेनं जौनपूर हादरलं

माहितीनुसार, केप वर्डे बेट युरोपियन युनियनच्या स्पॅनिश कॅनरी बेट समूहाच्या किनाऱ्यापासून सुमारे 600 किलोमीटर अंतरावर आहे. IOM चे प्रवक्त्यांनी सांगितले की 56 लोक अद्याप बेपत्ता आहेत.

सेनेगलच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ही बोट 10 जुलै रोजी सेनेगलच्या फासे बॉय येथून निघाली होती, ज्यामध्ये 101 प्रवासी होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com