Assembly Election Result 2023 Numerology : विधानसभा निवडणुकीत भाजपला ७ नंबरची साथ; साल २०१४ शी खास कनेक्शन

Assembly Election Result 2023 : अंकशास्त्रानुसार, २०१४ हे वर्ष ७ क्रमांकाचे वर्ष होते. याच वर्षी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचा देशात पराभव झाला होता.
Modi Shah
Modi Shah Saam TV
Published On

Assembly Election 2023 :

देशातील ४ पैकी २ मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. या निवडणुकीत भाजपला ७ नंबरचीही साथ मिळाली. २०१४ आणि २०२३ या दोन्ही विधानसभा निवडणुकांशी या संख्येचा संबंध आहे.

अंकशास्त्रानुसार, २०१४ हे वर्ष ७ क्रमांकाचे वर्ष होते. याच वर्षी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारचा देशात पराभव झाला होता. यानंतर २०१४ काली नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि भाजपच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. News 24 ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

अंक ज्योतिषी डॉ. राहुल सिंह यांच्या मते हा क्रमांक ७ काँग्रेससाठी अशुभ होता. २०२३ सालची संख्या देखील ७ आहे. सात क्रमांक हा केतू ग्रहाचे प्रतीक आहे आणि तो आश्चर्यांसाठी ओळखला जातो. त्यामुळेच यंदा विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल दिसतील.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Modi Shah
MP Election BJP Victory : मध्य प्रदेशात भाजपला मिळाली 'लाडली' बहिणींची साथ, जाणून घ्या BJP च्या विजयाची 10 मोठी कारणे

अंकशास्त्रानुसार, केतू ग्रहानुसार सात हा अंक काही अपवाद वगळता काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना धक्का देईल आणि आश्चर्यचकित करेल असे स्पष्ट संकेत होते. त्याचप्रमाणे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अमित शहा यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे आणि २०२३ सालाशी सुसंगत त्यांच्या नावाचा क्रमांकही ७ आहे.  (Telangana Assembly Election Results 2023)

Modi Shah
Election Results 2023 : जिथे पराभव तिथेच ताकदीनं घाव, काँग्रेसने जिंकलेली राज्ये भाजपने परत कशी मिळवली?

अंक ज्योतिषी डॉ. राहुल सिंह यांच्या मते, मध्य प्रदेशात भाजपच्या पुनरागमनावर नजर टाकली तर शिवराज सिंह चौहान यांचा क्रमांकही ७ आहे. त्यामुळे २०२३ च्या उरलेल्या दिवसांमध्ये केतू ग्रहाच्या प्रभावाखाली असलेले चेहरे आपल्याला अनेक आश्चर्याचे धक्के देतील. (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com