Assembly Election Result 2023: विधानसभा निवडणूक निकालानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले ....

Assembly Election Result 2023: चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होत असताना राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. वैचारिक लढा मात्र सुरूच राहील.
Assembly Election Result 2023
Assembly Election Result 2023Saam Digital
Published On

Assembly Election Result 2023

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा जाहीरनामा आणि काँग्रेसच्या गॅरंटी योजना अशी थेट लढत होती. लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या गेलेल्या या निवडणुकांमध्ये तीन राज्यांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप प्रचंड बहुमतात सत्तेत येण्याची शक्यता आहे. तर राज्यस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या हातातून सत्ता निसटताना दिसत आहे. तेलंगणात मात्र काँग्रेस बहुताचा आकडा गाठताना दिसत असून सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.

चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होत असताना राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या जनतेने दिलेला कौल आम्ही नम्रपणे स्वीकारत आहोत. वैचारिक लढा मात्र सुरूच राहील. तेलंगणातील जनेतेचे दाखवलेल्या विश्वासाबद्दल खूप आभारी आहोत. तेलंगणात लोकाभिमुख सरकार बनवण्याचे आश्वासन नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Assembly Election Result 2023
Anjani Kumar Suspended: उत्साह नडला, 'ती' भेट महागात पडली; तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांचे निलंबन; काय घडलं?

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनीही, तेलंगातील जनतेने काँग्रेसच्या बाजून जनादेश दिला आहे. हा तेलंगणातील जनतेचा आणि प्रत्येत कार्यकर्त्यांचा विजय आहे, असे म्हणत तेलंगणातील जनतेचे आभार मानले आहेत. तसेच काँग्रेस पक्ष तेलंगणात शांतता, समृद्धी आणि विकासासाठी कटिबद्ध आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, आणि छत्तीसगडच्या जनतेने काँग्रेसवर विरोधी पक्षाची जबाबदारी सोपवली आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Assembly Election Result 2023
Chhattisgarh Election Results: भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण? ओबीसी चेहरा की आदिवासी? कोणाची आहे चर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com