Assembly Election Result 2023: आजच्या विजयाने 2024 च्या हॅटट्रीकची गॅरंटी, PM नरेंद्र मोदींनी व्यक्त केला विश्वास

Assembly Election Result 2023: मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमते मिळत आहे आणि आजच्या या हॅटट्रीकमधून २०२४ च्या निवडणुकांची हॅट्रीक पक्की समजावी, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.
Assembly Election Result 2023
Assembly Election Result 2023Saam Digital
Published On

Assembly Election Result 2023

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमते मिळत आहे आणि आजच्या या हॅटट्रीकमधून २०२४ च्या निवडणुकांची हॅटट्रीक पक्की समजावी, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांकडे पाहिलं जात होतं. यातील तीन राज्यात भाजपने मोठी आघाडी घेतल्यानंतर आज मोदींनी जनतेला संबोधित करताना लोकसभा निवडणूकही भाजपच जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

तीन राज्यातील आघाडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात हजेरी लावली. यावेळी भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होत. मोदी भाषणासाठी व्यासपीठावर येताच उपस्थित कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, मोदी मोदी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्याचक्षणी मोदी म्हणाले, भारत माता की जय हा आवाज तेलंगणापर्यंत पोहोचला पाहिजे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जनतेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज सबका साथ सबका विकासाची भावना आणि आत्मनिर्भर आरताच्या संकल्पाचा विजय आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं. तेलंगणात देखील भाजवर जनतेचा विश्वास वाढत आहे. तसेच तुमच्या कुटुंबियांकडूनही प्रेम मिळतं , विश्वास मिळतो. त्यामुळे माझी जबाबदारी आणखीन वाढत आहे. आजही माझ्या मनात हीच भावना आहे.

Assembly Election Result 2023
Telangana Election Results: तेलंगणात काँग्रेसची जादू का चालली? काय आहेत कारणे, वाचा सविस्तर

या तिन्ही राज्यातील विजयाच्या हॅटट्रिकने २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची हॅट्रीक पक्की समजावी. सरकारने भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेल्या मोहिमेला यश मिळत आहे. भ्रष्टाचाऱ्यांना अभय देणाऱ्यांनी जनतेने धडा शिकवला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीला हा धडा आहे. घराणेशाहीचे समर्थन करणाऱ्या कुटुंबांना एकत्र घेऊन फक्त फोटो चांगला येऊ शकतो, मात्र जनतेचा विश्वास जिंकता येत नाही. जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी देशसेवेचा वसा लागतो, विरोधकांमध्ये तो दिसत नसल्याची टीका यावेळी मोदी यांनी केली.

Assembly Election Result 2023
Assembly Election Result 2023: विधानसभा निवडणूक निकालानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधींची पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाले ....

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com