Heavy Rain Alert : पावसाचा हाहाकार! लष्कर कॅम्पमधील २ शेल्टर गेले वाहून, ५ जवान बेपत्ता

Arunachal Heavy Rain Flood Update news : अरुणाचल प्रदेशातील दिबांग व्हॅलीत मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. लष्करी कॅम्पमधील दोन शेल्टर वाहून गेल्याने पाच जवान बेपत्ता असून NDRF आणि प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.
Arunachal Pradesh Flood: Five Army Personnel Missing After Flash Flood
Arunachal Pradesh Flood: Five Army Personnel Missing After Flash FloodSaam Tv
Published On
Summary
  • अरुणाचल प्रदेशमध्ये पावसाचा हाहाकार

  • दिबांग व्हॅलीत अचानक आलेल्या पुरामुळे लष्करी कॅम्पमधील दोन शेल्टर वाहून गेले

  • या दुर्घटनेत पाच जवान वाहून गेले

  • दोन जवानांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले

अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराच्या कॅम्पमध्ये मोठी दुर्घटना घडली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात कॅम्पमधील दोन शेल्टर वाहून गेले. या घटनेत लष्कराचे पाच जवान बेपत्ता झाले असून, दोन जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहेत. NDRF, स्थानिक पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांकडून बेपत्ता जवानांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. मात्र, परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

Arunachal Pradesh Flood: Five Army Personnel Missing After Flash Flood
Headache Tips : दुपारी झोपून उठल्यावर डोकं दुखत? तुम्हाला 'या' ६ आजारांचे संकेत तर नाहीत ना?

दिल्ली-एनसीआरमध्येही जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांची शक्यता असून, वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पावसासह वादळी वाऱ्यांचा अलर्ट देण्यात आला आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये व्यापक पावसाची शक्यता असून, डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका कायम आहे. दरम्यान, अरुणाचल प्रदेश, आसाम-मेघालय,पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज पाहूनच प्रवास करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Arunachal Pradesh Flood: Five Army Personnel Missing After Flash Flood
Shravan Fast : श्रावणात महिनाभर दारू न प्यायल्यास शरीरात होतील 'हे' ६ फायदे; वेळीच जाणून घ्या नाहीतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com