Turkiye Earthquake : तुर्कीमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; अनेक इमारती कोसळल्या, नागरिक भयभीत

तुर्कीमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Turkiye Earthquake Latest News
Turkiye Earthquake Latest News Saam TV
Published On

Turkiye Earthquake News : आशिया आणि युरोपचं प्रवेशद्वार असलेल्या तुर्कीमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी (२० फेब्रुवारी) रात्रीच्या सुमारास हे धक्के जाणवले असून नवीन भूकंपामुळे अनेक ठिकाणच्या इमारती कोसळल्या असल्याची माहिती आहे. या भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली आहे. (Latest Marathi News)

Turkiye Earthquake Latest News
Turkey Earthquake : तुर्कीमधील भूकंपात भारतीय नागरिकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली सापडला मृतदेह, टॅटूवरून पटली ओळख

भूकंपामुळे दक्षिण  तुर्कस्तानच्या काही भागात आणखी हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. लताकियात सुमारे 10 सेकंद भूकंपाचे दोन भूकंप जाणवले आहेत. यावेळी लोक हॉटेलमधून बाहेर आले आणि बाहेरील मोकळ्या जागी जमा झाले. अनेकांनी मोकळ्या जागी आसरा घेतला. तूर्तास कोणत्याही जीवितहानीचे वृत्त समोर आले नाही.

यूरोपीय भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने (EMSC) दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १.२ मैल अर्थात जवळपास दोन किलोमीटर खोल आहे. सोमवारी टर्की आणि सीरीया देशाचा सीमाभाग ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेनं हादरला आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

अगदी दोन आठवड्यांपूर्वी याच प्रदेशात विनाशकारी आणि प्राणघातक  भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपामध्ये ४५,००० हून अधिक लोक ठार झाले आणि १० लाखाहून अधिक लोक बेघर झाले आहेत. ठिकठिकाणी मोठमोठ्या इमारती कोसळल्या असून अजूनही ढिगाऱ्याखालून नागरिकांना बाहेर काढले जात आहे.

दरम्यान, भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी भारतासह ८४ देशांच्या पथकांकडून बचावकार्य सुरू आहे. भारताने बचावासाठी NDRF पथकाला तुर्कीमध्ये पाठवलं असून जगभरातून तुर्कीए आणि सीरियाला मदत दिली जात आहे. तुर्कीए आणि सीरियातील भूंकपग्रस्त शहर पुन्हा नव्याने उभी करण्याये आव्हान तुर्कीए सरकारसमोर आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com