Twitter Blue Tick News : ट्विटरचे (Twitter) नवे मालक इलॉन मस्क (Elon Musk) यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेतला असून तो पुन्हा चर्चेत आला आहे. अहवालानुसार, कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला लॉन्च केलेला ट्विटरवरील ब्लू टिकसाठीच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय रद्द केला आहे. कंपनीच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही सेवा सुरु झाल्यापासून बनावट खात्यांची संख्या झपाट्याने वाढू लागली होती, हे पाहता कंपनीने पेड सबस्क्रिप्शन सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ब्लू टिक विकत घेण्यासाठी आठ डॉलर मोजावे लागणार नाहीत.
निर्णय का बदलावा लागला
रिपोर्टनुसार, ब्लू टिक सब्सक्रिप्शन सेवा सुरू होताच बनावट खात्यांचा महापूर आला होता. कंपनीने आधी यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, गेल्या दोन दिवसांत बनावट खात्यांवरून काही आक्षेपार्ह ट्विट केले गेले, त्यामुळे कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे. एका वकारकर्त्याने Nintendo Inc नावाच्या पेड सबस्क्रिप्शनने निन्टेंडो इंक कंपनीच्या नावाने फेक अकाऊंटवर ब्लू टिक घेत सुपर मारिओचा फोटो पोस्ट केला.
त्याच वेळी, एका व्यक्तीने दिग्गज फार्मा कंपनी एली लिली अँड कंपनीच्या नावाने एका व्यक्तीने अकाऊंटवर ब्लू टिक घेतली आणि इन्सुलिन आता विनामूल्य असल्याचं ट्विट केले. एवढेच नाही तर एका व्यक्तीने टेस्ला कंपनीचे बनावट खाते तयार करून या कंपनीच्या सेफ्टी रेकॉर्डची खिल्ली उडवली. या संपूर्ण प्रकरणामुळे कंपनीने पेड सबस्क्रिप्शन सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांनी आतापर्यंत घेतलेले निर्णय जगभरात चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारताच सर्वप्रथम ब्लू टिकसाठी 8 डॉलर शुल्क द्यावे लागणार ही घोषणा केली. यानंतर कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. टाळेबंदी सुरू केली. त्यानंतर कंपनीने हाय-प्रोफाइल ट्विटर अकाऊंटसाठी ऑफिशिअल लेबल दिला आणी त्यानंतर ते हटवण्यात आले. आणि आता जेव्हा ट्विटरवर बनावट अकाऊंटची संख्या वाढली, तेव्हा 8 डॉलरचं ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनची सेवा रद्द करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.