Goa Election: गोव्यातील 'आप'च्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला

आप गोव्यातील विधानसभेच्या सर्व 40 जागा लढवणार
Arvind Kejrival
Arvind Kejrivalअनिल पाटील
Published On

नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी गोव्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून निवडणुक प्रचारासह आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. या निवडणुकीसंदर्भात आम आदमी पार्टीने (AAP) गोवा (Goa) विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला आहे. (Goa Assembly election 2022: Goa Aap CM Candidate Announced)

अमित पालेकर (Amit Palekar) हे गोव्यात आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. अमित पालेकर हे गोव्यात आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. तसेच आप गोव्यातील विधानसभेच्या सर्व 40 जागा लढवणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

अमित पालेकर हे भंडारी समाजातील आहेत. त्यांचे नाव जाहीर करताना अरविंद केजरीवाल म्हणाले की, ज्यांच्या हृदयात गोवा राहतो अशा व्यक्तीला मी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करत आहे. जे गोव्यातील सर्व लोकांना सोबत घेऊन चालेल. मग तो कोणताही धर्माचा असो व जातीचा. ज्याला आम्ही गोव्याचा मुख्यमंत्री बनवू, तो प्रामाणिक असेल. गोव्यातील भंडारी समाजाच्या लोकांवर आजवर अन्याय झाल्याची भावना आहे.

Arvind Kejrival
Nagar Panchayat Election: शहापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता

'आप'ने 10 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत

विशेष म्हणजे या महिन्याच्या ८ तारखेला आप ने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपचे माजी मंत्री महादेव नाईक, अलीना सालडांगा आणि अमित पालेकर यांच्यासह आणखी काही उमेदवारांची नावे होती.

गोव्यासाठी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत

आम आदमी पार्टीचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी गोवा विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोफत वीज आणि पाणी देण्यासोबतच १३ कलमी अजेंडा तयार केला आहे. अजेंड्यात राज्यातील शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि व्यापार, रोजगार, खाणकाम आणि पायाभूत सुविधांचा विकास यांचा समावेश आहे. आपल्या निवडणूक अजेंड्यात, आम आदमी पार्टीने राज्यातील लोकांना प्रति महिना 3000 रुपये बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय जमिनीचे हक्क देण्याचे आश्वासनही पक्षाने दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com