BJP chief : भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वतःलाच मारले चाबकाचे फटके, कारण काय? व्हिडीओ व्हायरल

BJP chief Protest : तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी स्वत:लाच चाबकाचे फटके मारून घेतले. अण्णा विद्यापीठात झालेल्या अत्याचाराच्या घटनेविरोधात भाजप आक्रमक झालेय.
BJP chief Protest
BJP chief Protest
Published On

Tamil Nadu BJP president Annamalai : अण्णा विद्यापीठातील विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झाली नाही. त्यातच एफआयआर कॉपी सार्वजनिक झाली, त्यामुळे त्या पीडित विद्यार्थीनीचं नाव चव्हाट्यावर आले. त्यामुळे तामिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांनी स्वत:ला चाबकाचे मारत राज्य सरकारच्या उदासीनतेचा निषेध केला. अन्नामलाई यांच्या या अनोख्या अंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

अन्नामलाई यांनी या आंदोलनासोबत करताच एक शपथही घेतली. जोपर्यंत द्रमुक सत्तेतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,अशी शपथही घेतली आहे. तांत्रिक बिघाडामुळे हा गंभीर प्रकार घडल्याचे तामिळनाडू पलिसांनी सांगितले. या घटनेचा निषेध करत अन्नामलाई यांनी स्वत:ला चाबकाच फटके मारत आंदोलन केले. अन्नामलाई यांचे हे आदोलन तामिळनाडूमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

चेन्नई येथील अण्णा विद्यापीठात १९ वर्षीय विद्यार्थिनीसोबत लैगिंक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपने आक्रमक पवित्रा घेतली. या प्रकरणात पीडित मुलीला न्याय मिळणयासाथी तामिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनी अनोखं आंदोलन केले. अन्नामलाई यांनी स्वत:ला चाबकाचे फटके मारत सरकारचा निषेध नोंदवला अन् टीकास्त्र सोडलं. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई म्हणाले की, ज्याला तमिळ संस्कृती समजते ते सर्व या भूमीचा एक भाग आहेत. स्वत:ला मारणे, स्वत:ला शिक्षा करणे आणि कठीण प्रसंगातून स्वत:ला सामोरे जाणे हा या संस्कृतीचा भाग आहे. राज्यात सातत्याने होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हे निदर्शन असल्याचे अन्नामलाई यांनी सांगितले.

अण्णा विद्यापीठातील प्रकरण नेमकं काय आहे?

चेन्नईमधील अण्णा विद्यापीठात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत लैगिंक अत्याचाराची घटना घडली. विद्यापीठाच्या परिसरातच त्या मुलीसोबत अत्याचार करण्यात आले. पोलिसांनी सुरूवातीला याबाबत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. पण विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. सोशल मीडियावरही आपला राग व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली. विद्यापीठाच्या बाहेर हातगाड्यावर बिर्याणी विकाणाऱ्याला अटक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com