नवी दिल्ली : कोलकाता आणि बदलापूरमधील घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेनंतर अनेक जण महिला सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत आहेत. याचदरम्यान आंध्रप्रदेशच्या विजयवाडातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आंध्रप्रदेशातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनींच्या हॉस्टेलमधील वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे आढळले आहेत. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मध्यरात्रीच कॉलेजबाहेर संताप व्यक्त केला.
आंध्र प्रदेशच्या इंजिनिअरींग कॉलेजच्या हॉस्टेलमधील विद्यार्थिनींच्या वॉशरुममध्ये छुपे कॅमेरे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे बी. टेकच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या एका विद्यार्थ्याने आणखी एका विद्यार्थ्याच्या मदतीने छुपे कॅमेऱ्याने व्हिडिओ काढल्याचा आरोप संतापलेल्या विद्यार्थ्यांचा आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केले आहेत.
संतापलेल्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या आवारात या धक्कादायक प्रकाराच्या विरोधात आंदोलन पुकारलं. विद्यार्थ्यांनी मोबाईलचे टॉर्च सुरु करून 'आम्हाला न्याय द्या' अशा घोषणा दिल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी विद्यार्थ्याचे नाव विजय असल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी हॉस्टेलमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. हॉस्टेलच्या आवारात मध्य रात्री ३.३० वाजेपर्यंत परिसरात तणावाचं वातावरण होतं.
छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर एका रिक्षा चालकाने पॅन्ट काढून अश्लील कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. समीर असं विकृत रिक्षा चालकाचं नाव आहे. रिक्षा चालकाला ६ व्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वेदांत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा चौक ते कोकणवाडी दरम्यान हा प्रकार घडला आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला होता. कारागृहातून परत आल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर त्याने हे कृत्य केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.