अनेकदा आपल्याला विमान अपघाताच्या घटना पाहायला मिळतात.सर्वसामान्य नागरिक देखील आता विमानाने सहज प्रवास करु शकता.अशाच बहुतांश प्रवाशांना विमानाने प्रवास करणाऱ्या अपघाताची सर्वाधिक भीती असते.अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये गुरवारी दुपारी दोन वाजता एक दुर्घटना घडली आहे . सिडनीच्या नैऋत्येकडील बँकस्टाउन विमानतळावरुन ३७ वर्षीय पुरुष आणि ३४ वर्षीय महिलेला घेऊन पाईपर पीए -२८ विमानाने उड्डाण केली होती.पण उड्डाणच्या अवघ्या पाच मिनिटांत,विमानाचे इंजिन निकामी झाले ,आणि ते शाळेच्या क्रीडा मैदानाजवळ पडले.
पायलट आणि ३४ वर्षीय महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र,या अपघाताने जीवित हानी नाही नसली झाली तरी एका शाळेजवळ हा विमान अपघात झाला आहे.अपघाताचे कारण म्हणजे इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याचे पायलटने सांगितले. यामुळे पायलट विमानाची इमर्जन्सी लॅंडींग करत होता , मात्र ते अचानक जमिनीवर कोसळले. या घटनेनंतर आपत्कालीन(Emergency) सेवा तातडीने अपघातस्थळी पोहोचली.
लोकांची आरडाओरड सुरु
मीडिया रिपोर्टसनुसार,ऑस्ट्रेलियाच्या ग्रेटर वेस्टर्न सिडनी भागात हा अपघात झाला. "मेरी इमॅक्युलेट कॅथोलिक प्राथमिक" शाळेजवळच्या मैदानात हे विमान(plan) कोसळलं तेव्हा ते केवळ ५ मिनिट हवेत होतं.पण मैदानात उभ्या असलेल्या लोकांना धक्का बसला आणि लोकांनमध्ये गोधंळ निर्माण होऊन , भीतीचं वातावरण पसरले होते.सुदैवाने विमानाला आग लागली नाही. नाहीतर अनेकांना जीव गमवावा लागला असता.
अपघातादरम्यान नेमकं काय घडलं ?
मीडिया रिपोर्टसनुसार , पायलटने कॉलवर सांगितले की माझं इंजिन (engine)बिघडल होतं . त्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही . ज्यावेळी हे विमान कोसळलं त्यावेळी मैदानात मुले बास्केटबॉल खेळत नव्हती. विमान जिथे पडले तिथे त्यावेळी आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यावेळी हे विमान बास्केटबॅालजवळच्या झाडांमध्ये अडकलं होतं. पायलटने प्रत्यक्षात घडलेल्या अपघातापेक्षा मोठा अपघात वाचवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.