नवी दिल्ली : अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील आरोपींपैेकी तीन आरोपींना ३ संशयित आंतरराष्ट्रीय फोन कॉल आले होते. सदर संशयित कॉल हे आरोपी इरफान शेख, अब्दुल तौफिक आणि आतिब राशिद यांना हे फोन आले होते. या तिघांना २५ मे रोजी जर्मनी, ब्रिटेन आणि पाकिस्तानातून फोन आले होते. या आरोपींनी चौकशीदरम्यान हा धक्कादायक खुलासा केला आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (NIA) सूत्रांनी दिली आहे. (Amravati Umesh Kolhe Case Update)
एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, उदयपूरच्या शिंपी व्यावसायिकाच्या हत्येचे मुख्य आरोपी आणि अमरावतीमधील उमेश कोल्हे हत्येचे मुख्य आरोपी यांचे कनेक्शन आहे की नाही किंवा दोन्ही प्रकरणांचा मुख्य आरोपी हा एकच आहे. याचा तपास करण्यासाठी एनआयए त्या अमरावती प्रकरणातील आरोपींना राजस्थानमध्ये घेऊन जाण्यात येणार आहे.
दरम्यान, मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी अमरावतीमध्ये हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. उमेश दुकान बंद करून रात्री निघाले होते. उमेश कोल्हे यांनी भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पोस्टचे समर्थन केलं होतं. त्यामुळे हल्लेखोरांकडून कोल्हे यांची हत्या झाली होती.
दरम्यान, एनआयएने शुक्रवारी मुंबईतील एका कोर्टाने म्हटले की, नुपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने अमरावतीतील मेडिकल व्यावसायिकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे. सदर प्रकरणातील सात आरोपी हे एनआयएच्या ताब्यात आहेत. कोर्टाने 'एनआयए' संस्थेला आरोपींचा सोपावलेला ताबा हा २२ जुलैपर्यंत वाढविला आहे. एनआयए संस्थेने सदर तपास अमरावती (Amravati) पोलिसांच्या हातून स्वत:कडे घेतला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.