श्रीनगर: अमरनाथ (Amarnath) गुंफेजवळ ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य वेगाने सुरू आहे. आयटीबीपीचे (ITBP) जवानही शनिवारपासून मदतकार्य करत आहेत. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. तर सुमारे ४० जण बेपत्ता असून पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
पवित्र गुंफेजवळ ५ पुरुष आणि ३ महिला यात्रेकरूंचा या अपघातात मृत्यू झाला, तर दुसऱ्या गुंफेजवळ ३ पुरुष आणि २ महिलांनी आपला जीव गमावला आहे.
दक्षिण काश्मीरमध्ये असलेल्या पवित्र अमरनाथ गुंफेजवळ मुसळधार पावसाच्या दरम्यान, सायंकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. त्यानंतर डोंगराच्या उतारावरून पाण्याचा आणि गाळाचा दाट प्रवाह दरीकडे वाहू लागला. त्यामुळे गुंफेच्या बाहेर बेस कॅम्पमध्ये बांधलेले २५ तंबू आणि तीन कम्युनिटी किचन उद्ध्वस्त झाले.
लष्कर, बीएसएफ (BSF), आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफ, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि इतर अधिकारी मदत आणि बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीर प्रशासनाने बचाव कार्यासाठी प्रगत हलकी हेलिकॉप्टरही तैनात केली आहेत. ६ पथके मदत आणि बचाव कार्य करत आहेत.
काश्मीरमधील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना ताबडतोब ड्युटीवर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. श्रीनगर, बांदीपोरा, बारामुल्ला आणि बडगामच्या सीएमओना डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफची अतिरिक्त टीम बालटालला पाठवण्यास सांगण्यात आले आहे. औषधे आणि आपत्कालीन वैद्यकीय किट देखील मागविण्यात आले आहेत. गांदरबलचे सीएमओ डॉ. ए. या अपघातात (Accident) १५ जणांचा मृत्यू झाला असून ४८ जण जखमी झाल्याची माहिती शाह यांनी शुक्रवारी दिली होती. जखमींवर अप्पर होली केव्ह, लोअर होली केव्ह आणि पंजतरणी येथील बेस हॉस्पिटलमध्ये (Hospital) उपचार सुरू आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.