Dog Addicted To Drinks
Dog Addicted To DrinksSaamtv

Dog Addicted To Alcohol: अरेरे! मालकाच्या मृत्यूनंतर कुत्रा झाला बेवडा; अखेर अशी सोडवली दारु

Dog Treated for Alcohol Addiction: बाबो! चक्क कुत्राच झाला दारुडा, अखेर त्याला व्यसन मुक्ती केंद्रात दाखल केल्याचेही समोर आले आहे.
Published on

Alcoholic Dog Viral News: एखादी जवळची व्यक्ती सोडून गेल्याने नैराश्येत अनेकजण दारुच्या आहारी गेल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकल्या आहेत. पण सध्या एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. पण चक्क एक कुत्रा आपल्या मालकाच्या निधनानंतर दारुडा झाल्याचा प्रकार कधीच ऐकला नसेल.

अशीच एक घटना ब्रिटनमध्ये समोर आली आहे. जिथे कोको नावाच्या एका लॅब्राडोर क्रॉस ब्रीडच्या कुत्र्याला ड्रग्जचे व्यसन लागले आणि त्याची प्रकृती बिघडली. अखेर त्याला व्यसन मुक्ती केंद्रात दाखल केल्याचेही समोर आले आहे. (Latest Marathi News)

Dog Addicted To Drinks
Manipur Violence Update: मणिपूरमधील परिस्थिती चिघळली; हिंसाचारानंतर कर्फ्यू लागू, इंटरनेटपाठोपाठ आता रेल्वेसेवाही बंद

याबाबत न्यूजवीकने दिलेल्या माहितीनुसार, कोको नावाच्या 2 वर्षीय लॅब्राडोरला एका कुत्र्यासह प्राणी बचाव ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आले. प्राणी कल्याण चॅरिटीच्या फेसबुक पेजनुसार, अतिमद्य प्राशन केल्याने ते दोन्हीही कुत्रे आजारी होते. सर्वोतोपरी प्रयत्न करूनही दुसऱ्या कुत्र्याला वाचवता आले नाही. दोन्ही कुत्र्यांना झटके येऊ लागल्याने त्यांना ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आले. तसेच या कोकोला उपचारासाठी चार आठवडे बेशुद्ध ठेवण्यात आल्याचेही सांगितले आहे.

चार आठवडे ठेवले बेशुद्ध...

की कोको गंभीर आजारी आहे आणि त्याची 24 तास काळजी आवश्यक आहे. त्याला मद्यपान सोडण्याची नितांत गरज होती. कोकोला झटके येऊ लागले. त्यामुळेच उपचारासाठी संपूर्ण चार आठवडे बेशुद्ध ठेवण्यात आले, जेणेकरून त्याला वारंवार झटके येऊ नयेत आणि तो लवकर बरा होऊ शकेल. (Viral News)

Dog Addicted To Drinks
Jalna News: कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू; अंबड तालुक्यातील घटना...

कोकोची प्रकृती सुधारत आहे...

मात्र, आता कोको बऱ्यापैकी सावरला आहे. कोको आता सामान्य कुत्र्याप्रमाणे वागत आहे. अशी माहिती सेंच्युरीच्या व्यवस्थापकांनी सांगितली आहे. तसेच त्याला आता इतर कुत्र्यांपासून दूर ठेवण्यात आल्याचेही सांगितले आहे. दरम्यान, एखादा कुत्रा नशेच्या आहारी जाणे ही अत्यंत दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे या कोकोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com