

Gold Siver Price Today: तुम्ही जर स्वस्तात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या १० दिवसांत सोन्याचा भाव तब्बल ११०० रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे.
जानेवारी ते एप्रिल महिन्यात सोने-चांदीने (Gold Silver Price) उच्चांक गाठला होता. दिवसागणिक सोन्याचा भाव वाढतच होता. यादरम्यान काही नवीन विक्रम नोंदवले गेले होते. पण मे महिना सुरू झाला आणि सोन्याला ओहोटी लागली. तेव्हापासून सोने-चांदी दरात सातत्याने घसरण होत आ
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी म्हणजेच शनिवार आणि रविवारी सोने-चांदीचे भाव जाहीर करत नाही. शुक्रवारी जारी केलेल्या दरानुसार, २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचा भाव प्रतितोळा ५९ हजार १८० रुपये इतका आहे.
मागील आठवडाभरातील सोन्याची (Gold Price) वाटचाल पाहता, सोन्याचे दर तब्बल ११०० रुपयांनी घसरले आहे. जागतिक केंद्रीय बँका व्याजदर वाढविण्याची शक्यता पाहता, सोन्यावर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोने आणखीच स्वस्त होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सोन्याबरोबरच चांदीच्या (Silver Price) भावातही मोठी घसरण झाली आहे. चांदीचा भाव गेल्या १० दिवसांत ३ हजार रुपयांनी घसरला आहे. सध्या सराफा बाजारात १ किलो चांदीचा भाव ७० हजार ९०० रुपये इतका आहे. गेल्या १० दिवसात चांदीचे अवसान गळाले असल्याचं दिसून येत आहे.
सोन्याची शुद्धता जाणून घेण्याची सोपी पद्धत आहे. भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. २४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर २२ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९१६ मानक अंकीत असते. २२ कॅरेट सोने जवळपास ९१ टक्के शुद्ध असते. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. २४ कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.