Air India : सामूहिक रजा घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एअर इंडियानं 'इमर्जन्सी' जमिनीवर उतरवलं; थेट कामावरूनच काढलं!

Air india fires cabin crew members : एअर इंडिया एअरलाइन्सने स्वत:च्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक सामूहिक रजा घेणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे.
Air India
Air India Saam TV

नवी दिल्ली : एअर इंडिया एअरलाइन्सने स्वत:च्या कर्मचाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी अचानक सामूहिक रजा घेणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतल्यानंतर काही फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एअर इंडियाने कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर न राहाणं महागात पडलं आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या क्रू मेंबर्स सामूहिक आजारी सुट्टीवर गेले होते. काल एअर इंडियावर १०० हून अधिक कर्मचारी सामूहिक सुट्टीवर गेल्याने ७० अधिक विमाने रद्द करण्याची नामुश्की कंपनीवर ओढावली होती. तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाईल देखील बंद केले होते.

Air India
Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

बुधवार एअरलाईनच्या सीईओने सांगितलं होतं की, मंगळवारी सायंकाळी १०० हून अधिक केबिन क्रू मेंबर्सने आजारी सुटीमुळे येऊ शकणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे शेकडो कर्मचारी अचानक आजारी सुट्टीवर गेल्याने अनेक फ्लाईट्स रद्द कराव्या लागल्या'.

Air India
Sam Pitroda Resigns: वादग्रस्त विधानाने काँग्रेसला टाकलं गोत्यात; सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; काय होता वाद?

शेकडो क्रू मेंबरने अचानक आजारी सुट्टीवर गेल्याने एअर इंडियाला अचानक १३ मेपर्यंतची काही उड्डाणे रद्द करावी लागली. मंगळवारी रात्री १०० हून अधिक देशांतर्गत उड्डाणे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच यावेळी १५००० प्रवाशांना फटका बसला.

Air India
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा हाणामाऱ्यांनी गाजला! महाराष्ट्रात ३ ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये राडा

कंपनीने मागितली माफी

कंपनीने प्रवाशांची माफी मागत पोस्ट करत म्हटलं की, 'विमानतळावर अचानक उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांची माफी मागतो. प्रवाशांना होणाऱ्या अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. विमानतळावर पोहोचण्यापूर्वी तुमची फ्लाइटविषयी माहिती जाणून घ्याल, तुमच्या तिकीटाच्या रिफंडसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या '.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com