Sharad Pawar Latest Press Conference: 'वय मुद्दा नाही, ८२ काय वयाच्या ९२ वर्षांपर्यंतही लढू, शरद पवारांनी बंडखोरांना ठणकावून सांगितलं...

'वय मुद्दा नाही, ८२ काय वयाच्या ९२ वर्षांपर्यंतही लढू, शरद पवारांनी बंडखोरांना ठणकावून सांगितलं...
Sharad Pawar Latest Press Conference
Sharad Pawar Latest Press ConferenceSaam Tv
Published On

Sharad Pawar on Ajit Pawar: 'वय हा मुद्दा नाही, वयाच्या ८२- ९२ वर्षांपर्यंत आणखी प्रभावीपणे लढा देईल', असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत. बुधवारी झालेल्या सभेत अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून त्यांना लक्ष्य केलं होतं. वरिष्ठांनी कुठेतरी आता थांबलं पाहिजे, असं म्हटलं होतं. यावर आज शरद पवार यांनी नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच : शरद पवार

दिल्लीत आज राष्ट्रवादी कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते असं म्हणले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले आहेत की, ''राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे. बाकी कोणी काय बोलतोय यात तथ्य नाही.''

Sharad Pawar Latest Press Conference
Lalu Prasad Yadav on Ajit Pawar: शरद पवारांच्या वयावर अजित पवारांनी केलं वक्तव्य, लालू प्रसाद यादव म्हणाले...

भाजपवर हल्लाबोल करत शरद पवार म्हणाले आहेत की, सत्तेत असलेल्यांना, आता सत्तेबाहेर बसावं लागेल. ते म्हणाले आहेत की, मजबुतीने पक्षाला पुढे घेऊन जायचा निर्णय झाला आहे. आजची मीटिंग आमचा उत्साह वाढवणारी होती. (Latest Marathi News)

कार्यकारणीत कोणते ठराव झाले मंजूर?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि भाजपशी हातमिळवणी केलेल्या राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या महाराष्ट्रातील 9 आमदारांची हकालपट्टी करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे.

Sharad Pawar Latest Press Conference
Rohit Pawar On Chhagan Bhujbal: ...हेच का आपलं वैचारिक अधिष्ठान?, रोहित पवारांचा छगन भुजबळावर निशाणा

मणिपूरमधील सध्याच्या सांप्रदायिक परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मणिपूरच्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भाजप सरकारच्या लोकशाहीविरोधी आणि असंविधानिक कृती आणि विरोधी पक्षांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com