Shraddha Walkar: आफताबच्या व्हॅनवर तरूणांचा सशस्त्र हल्ला, घटनेचा VIDEO आला समोर

Shraddha Walkar: आफताबच्या व्हॅनवर तरूणांचा सशस्त्र हल्ला, घटनेचा VIDEO आला समोर

पोलीस व्हॅनमध्ये बसून निघाला असताना 4-5 जणांनी तलवारीने गाडीवर हल्ला केला.

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताब पूनावालाच्या व्हॅनवर दिल्लीत हल्ला झाला आहे.आरोपी आफताब पॉलिग्राफ टेस्टनंतर पोलीस  (Police) व्हॅनमध्ये बसून निघाला असताना काही जणांनी तलवारीने गाडीवर हल्ला केला.

आफताबवर 15 लोकांनी हल्ला केला. हल्ला करणाऱ्यांमधील एका आरोपीचे नाव निगम गुर्जर असं आहे. हल्लेखोरांना हल्ला करून आफताबची हत्या करायची होती. पोलिसांनी एक मारुती व्हॅन आणि तलवारी जप्त केल्या आहेत. आफताबवर हल्ला केल्याची जबाबदारी हिंदू सेनेने घेतली आहे. तर हल्ला करणारे गुडगावचे रहिवासी आहेत.

Shraddha Walkar: आफताबच्या व्हॅनवर तरूणांचा सशस्त्र हल्ला, घटनेचा VIDEO आला समोर
Shraddha Walkar: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आफताबविरुद्ध कठोर कारवाईस होणार मदत

आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट पार पडली. पॉलीग्राफ टेस्टनंतर एफएसएल टीम आफताबला घेऊन बाहेर आली. त्यानंतर काही लोकांच्या जमावाने घटनास्थळी पोलीस व्हॅनवर हल्ला केला. या लोकांच्या हातात तलवारी होत्या आणि ते आफताबला मारण्याबाबत बोलत होते. जेव्हा हल्ला झाला तेव्हा एक पोलिस व्हॅनमधून बाहेर आला आणि त्याने या लोकांवर बंदूक दाखवली. (Latest Marathi News)

संतप्त जमावाने पोलीस व्हॅनवरही दगडफेक केली. ज्याने हल्ला केला तो म्हणाला, त्याला दोन मिनिटांसाठी बाहेर काढा, मी त्याला मारून टाकेन. आफताबच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Shraddha Walkar: आफताबच्या व्हॅनवर तरूणांचा सशस्त्र हल्ला, घटनेचा VIDEO आला समोर
Delhi Crime News : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती; मुलाच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

आफताबवर त्याची गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. मात्र ठोस पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांना आफताबकडून अनेक प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. मात्र आफताब पोलिसांना योग्य माहिती देत नसल्याने त्याची पॉलीग्राफ टेस्ट केली जात आहे. यामुळे आफताब विरोधात कठोर कारवाईसाठी पुरावे गोळा करण्यासा पोलिसांना मदत मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com