Shraddha Walkar: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आफताबविरुद्ध कठोर कारवाईस होणार मदत

आफताबने श्रद्धाची अंगठी तिच्या हत्येनंतर घरी आलेल्या सायकोलॉजिस्ट मैत्रिणीला गिफ्ट केली होती.
Shraddha Walkar
Shraddha WalkarSaam TV

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. आरोपी आफताब पूनावालाभोवतीचा कठोर कारवाईचा फास आवळण्याची दाट शक्यता आहे. कारण आफताबने श्रद्धाची हत्या करण्यासाठी वापरलेलं हत्यार पोलिसांना (Police)  मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

श्रद्धाची हत्या केल्यानंतर शरीराचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  (Latest Marathi News)

Shraddha Walkar
Delhi Crime News : श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती; मुलाच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले

दिल्ली पोलिसांनी याआधीही दावा केला आहे की आरोपी आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह कापण्यासाठी पाच चाकू वापरले. त्याचबरोबर याआधीही पोलिसांनी काही चाकू जप्त करून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.

Shraddha Walkar
Shraddha News Update: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी नवीन अँगल; अंमली तस्कर पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांना तपासात श्रद्धाची एक अंगठी देखील पोलिसांना मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आफताबने ही अंगठी श्रद्धाच्या हत्येनंतर घरी आलेल्या सायकोलॉजिस्ट मैत्रिणीला गिफ्ट केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com