Kabul Blast: अफगानिस्तान हादरलं! राजधानीमधील हॉटेलमध्ये मोठा स्फोट, अनेक लोकांचा मृत्यू

Kabul Blast: काबूल शहर-ए-नव परिसरातील एका हॉटेलमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. तालिबानच्या गृह मंत्रालयाने या घटनेची पुष्टी केली आहे.
Kabul Blast:
Security personnel cordon off the area after a deadly explosion at a hotel in Kabul’s Shahr-e-Naw district. File Pic Saamtv
Published On
Summary
  • अफगानिस्तानची राजधानी काबूल हादरली

  • शहर-ए-नव परिसरातील हॉटेलमध्ये भीषण स्फोट

  • अनेक मृत्यू आणि जखमी झाल्याची शक्यता

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील शहर-ए-नव परिसरातील एका हॉटेलमध्ये एक भीषण स्फोट झालाय. या स्फोटात अनेकांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झालेत. या स्फोटाच्या वृत्ताला तालिबानच्या गृह मंत्रालयाने दुजोरा दिलाय. स्फोट ज्या हॉटेलमध्ये झाला त्या हॉटेलमध्ये परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणात राहतात. विशेष म्हणजे स्फोट झालेलं ठिकाण हे काबूलमधील सर्वात सुरक्षित क्षेत्रांपैकी एक मानले जाते. शहर-ए-नौ जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये स्फोट झाल्याची माहिती प्रवक्ते खालिद जादरान यांनी दिलीय.

Kabul Blast:
भयंकर! २ हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक, २१ प्रवाशांचा मृत्यू, ३० जणांची प्रकृती गंभीर

गृह मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल मतीन कानी म्हणाले की, या स्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे तर काही जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या नेमकी किती आहे, आणि कशामुळे स्फोट झाला याचा तपास केला जात आहे. तसेच अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे अद्याप मृतांच्या नेमक्या संख्येबद्दल सविस्तर माहिती नाहीये. अधिक माहिती उपलब्ध झाल्यानंतरच ते योग्य माहिती देऊ शकतील.

Kabul Blast:
तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार? इराणवर होणार विध्वसंक हल्ला?

वृत्तानुसार, तेथे असलेल्या लोकांनी स्फोटाचा आवाज ऐकला आणि घटनास्थळावरून धूर निघताना दिसला. स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरात चेंगराचेंगरी झाली. लोकं सैरवैर पळू लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटाची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. तपास यंत्रणा स्फोट कशामुळे झाला याचा शोध घेत आहेत. या घटनेत कोण सामील होते हे अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु या स्फोटात इस्लामिक स्टेट-खोरासान (ISIS-K) चा हात असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com