Amanatullah Khan Arrested : आप आमदार अमानतुल्लाह खान अटकेत, निकटवर्तींयांकडे मिळाली होती २४ लाख रोकड

एसीबीच्या छापेमारीनंतर अमानतुल्लाह खान यांना अटक करण्यात आली आहे.
Amanatullah Khan Arrested Latest Update
Amanatullah Khan Arrested Latest UpdateSAAM TV

AAP MLA Amanatullah Khan Arrested | नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना ACB ने अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, शुक्रवारी अमानतुल्लाह यांची चौकशी केल्यानंतर त्यांच्या घरासह अन्य पाच ठिकाणांवर छापे मारले होते. अमानतुल्लाह यांची वक्फ बोर्डात गैरव्यवहार केल्याच्या आरोप प्रकरणात चौकशी सुरू आहे.

आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार अमानतुल्लाह खान यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर शुक्रवारी एसीबीने छापे (ACB) मारले होते. २४ लाख रुपये रोकड आणि दोन पिस्तूल जप्त करण्यात आले होते. त्यातील एक पिस्तुल विदेशी बनावटीचे होते. त्याचा परवाना देखील नाही. अमानतुल्लाह खान यांच्या घरीही छापा मारला होता. त्यांच्या विरोधात पुरावे आणि आक्षेपार्ह वस्तू सापडल्या आहेत. त्याआधारे त्यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असे एसीबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Amanatullah Khan Arrested Latest Update
Breaking : ऑक्टोबरमध्ये PM नरेंद्र मोदी मुंबई-ठाणे दौऱ्यावर?

एसीबीच्या छापेमारी दरम्यान आम आदमी पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष आणि अमानतुल्लाहचे निकटवर्तीय कौशर इमाम सिद्दकी यांच्या इथे रोकड, पिस्तुल आणि काडतुसे सापडली आहे. कौशर इमाम यांच्या घरातून १२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत छापेमारीत एकूण २४ लाख रोकड आणि दोन शस्त्रे आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

तत्पूर्वी, अमानतुल्लाह यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. हे लोक (एसीबी) सांगत आहेत की वरून दबाव आहे. कुणीही तक्रार करत आहे. वक्फ बोर्डाचे सीईओंच्या तक्रारीवर ही कारवाई करण्यात आली आहे. कॉन्ट्रॅक्टसाठी नाही, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही झाल्या होत्या.

दंगलीच्या वेळी माझे खासगी अकाउंट, रिलीज अकाउंट उघडता येणे शक्य नव्हते. माझ्या आधी २४ जणांची भरती केली होती. सर्वांना मेरीटच्या आधारावर घेतले होते. तक्रार करणाऱ्या सीईओंनी या लोकांची निवड केली. हे २०२२ च्या नोंदी मागत आहेत. रिलीफ कमिटी २०२० मध्ये स्थापन झाली. एफआयआर त्याच्या आधी करण्यात आला. मी कोणतेही प्रकरण प्रभावित केले नाही. काही चुकीचे केले नाही. मी सर्व मापदंडांचे पालन केले. माझ्याविरोधात एफआयआर आहे, असे अमानतुल्लाह यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com