Jammu-Kashmir : 'आप'ला पाठिंबा NC ला ! एकुलत्या एक आमदाराचं नायब राज्यपालांना पत्र

Jammu-Kashmir Assembly Elections: आपने जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
'आप'ला पाठिंबा NC ला ! एकुलत्या एक आमदाराचं नायब राज्यपालांना पत्र
Arvind Kejriwal and Omar AbdullahSaam Tv
Published On

आम आदमी पक्षाने (AAP) जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबतचे समर्थन पत्र नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांना सादर करण्यात आल्याचे पक्षाने शुक्रवारी सांगितलं आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत आपचा एक आमदार विजयी झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने 42 जागा जिंकल्या.

तसेच इंडिया आघाडीचा सहकारी काँग्रेसला 6 जागा मिळाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने 29 जागा जिंकल्या, जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) 3 जागा जिंकल्या आणि पीपल्स कॉन्फरन्स, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि आम आदमी पार्टीने प्रत्येकी एक जागा जिंकली. अपक्ष उमेदवारांनी 7 जागा जिंकल्या आहेत.

'आप'ला पाठिंबा NC ला ! एकुलत्या एक आमदाराचं नायब राज्यपालांना पत्र
Shiv Sena Dasara Melava: विधानसभेपूर्वी CM शिंदेंची कसोटी? 50 आमदार निवडून आणण्याचे आव्हान; दसरा मेळाव्यात शिंदें काय बोलणार?

नॅशनल कॉन्फरन्स विधिमंडळ पक्षाने आपले उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांची श्रीनगरमधील एनसी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. तर काँग्रेस विधिमंडळ पक्ष आपला नेता निवडण्यासाठी शुक्रवारी श्रीनगरमध्ये बैठक घेणार आहे.

याबाबत माहिती देताना काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, ''जम्मू आणि काश्मीर प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख तारिक हमीद कारा यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत निवड झालेल्या नेत्याच्या नावाला पक्ष हायकमांडकडे पाठवण्यात येईल.''

'आप'ला पाठिंबा NC ला ! एकुलत्या एक आमदाराचं नायब राज्यपालांना पत्र
Sayaji Shinde Join NCP: अभिनेते सयाजी शिंदे विधानसभेच्या रिंगणात? अजित पवार गटात केला प्रवेश

याचबद्दल बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, 7 पैकी 4 अपक्ष आमदारांनी पक्षाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे विधानसभेतील पक्षाचे संख्याबळ 46 वर पोहोचले आहे. अब्दुल्ला म्हणाले, 'काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. त्यांना निर्णय घेण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी आम्हाला समर्थन पत्र देताच. मी सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com