लाखोंच्या पगाराचे आमिष दाखवून आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. तब्बल 800 भारतीय तरुणांना म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झालाय. विशेष म्हणजे या छळछावणीत महाराष्ट्रातले तरूणही डांबलेले आहेत. मात्र, हा सगळा प्रकार उघड झाला तो बीडच्या एका तरुणाच्या फोनकॉलमुळे... या तरुणानं आपल्या मित्राला फोन करून नेमकी काय माहिती दिलीये ऐका....
फोनवरून अमानुष अत्याचाराचा थरकाप उडवणारा हा अनुभव बीडच्या तरुणानं सांगितलाय. यामुळे मात्र आंतराष्ट्रीय मानवी तस्करीचं रॅकेट समोर आलंय. म्यानमार आणि थायलंडच्या सीमेवर ओलीस असलेल्या भारतीयांसोबत नेमकं काय घडतंय पाहूयात....
नोकरीचं आमिष, 800 भारतीय ओलीस
थायलंडमध्ये नोकरीचं आमिष दाखवून 800 भारतीय म्यानमारमध्ये ओलीस
महाराष्ट्रातील 25 तरुणांचाही समावेश
फेसबुक जाहिरातीद्वारे बीडच्या 24 वर्षीय तरुणाला बँकॉकमध्ये दरमहा 70 हजाराच्या पगाराचं आमिष
बँकॉकमध्ये पोहोचताच म्यानमार सीमेवरील जंगलात नेऊन पासपोर्ट, कागदपत्र काढून घेतली
लहान खोलीत कोंडून बंदुकीच्या धाकावर सायबर फसवणुकीची सक्ती
नकार देणाऱ्या तरुणांना विजेचे शॉक आणि अमानुष मारहाण
तीन भारतीयांना गोळ्या घातल्या, पीडित तरुणाच्या फोनमुळे मानवी तस्करी उघड
दरम्यान, म्यानमार सीमेवर ओलीस असलेल्या भारतीयांची सुटका करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली जातेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी परराष्ट्र खात्याकडे हस्तक्षेप करण्याची मागणी केलीये.
तर दुसरीकडे, या प्रकरणात बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाला दिलीये. आता या तरुणांची सुटका कधी आणि कशी होणार असा प्रश्न नातेवाईकांना पडलाय. मात्र, गलेलठ्ठ पगाराच्या आमिषानं परदेशात भारतीयांना ओलीस ठेवल्याचा हा काही पहिलाच प्रकार नाहीये. गुजरातच्या एका ठगानं म्यानमारमध्ये नोकरीचं आमिष देऊन राजस्थानमधील अनेक तरुणांना गंडवलं होतं. खरंतर, परदेशात जाऊन नोकरी करून जास्त पैसे कमावण्याचं सर्वांचचं स्वप्न असतं. मात्र, आता नोकरीची ही ऑफऱ तुमच्या फायद्याचीच असेल असं नाही. त्यामुळे अशा फसव्या जाहिराती पाहून परदेशात जाताना योग्य ती खबरदारी घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.