Jaipur Accident: महाकुंभमेळ्याला जाताना भीषण अपघात, ८ भाविकांचा जागीच मृत्यू

Bus-car collision Jaipur Accident: मोखमपुराजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. टायर फुटल्यामुळे खासगी बस चारचाकीला जाऊन धडकली. ज्यात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६ जण गंभीर जखमी आहेत.
Jaipur News
Jaipur NewsSaam Tv News
Published On

जयपूरमधील दुडू येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील मोखमपुराजवळ एक भीषण रस्ता अपघात घडला आहे. टायर फुटल्यामुळे अनियंत्रित झालेल्या खासगी बसनं एका चारचाकीला धडक दिली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू तर, ६ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. या अपघात प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अपघात कसा घडला?

खासगी बस जयपुरहून अजमेरला जात होती. तर, दुसऱ्या बाजूनं चारचाकी येत होती. दरम्यान, अचानक खासगी बसचा टायर फुटला आणि खासगी बस चारचाकीला जाऊन धडकली. या अपघातात चारचाकीमध्ये असलेल्या ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, ६ जण जखमी झाले आहेत. गाडीतील सर्व प्रवासी भिलवाडा येथील रहिवासी होते.

Jaipur News
Beed Crime News: बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! हॉटेलमध्ये घुसून बेदम मारहाण, तरुण गंभीर जखमी; VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बसने चारचाकीला धडक दिल्यामुळे रस्त्यावर काही वेळ चक्काजाम झाला होता. अपघाताशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कारमधील प्रवासी महाकुंभमेळ्याला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

Jaipur News
Crime News: वडिलांच्या मित्राचं सैतानी कृत्य! लैंगिक अत्याचारानंतर चिमुकलीची गळा आवळून हत्या

अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघाताबाबत एसपी आनंद कुमार शर्मा म्हणाले, 'खासगी बस जयपुरहून अजमेरला जात होती. चारचाकी अजमेरहून जयपूरच्या दिशेनं येत होती. दरम्यान, मोखमपुराजवळ खासगी बसचा टायर फुटला. अनियंत्रित झालेली बस चारचाकीला जाऊन धडकली. यात चारचाकीमधील ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय. अपघातानंतर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात जखमी झालेले मृतदेह शववितच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com