Andhra Pradesh Accident: आंध्रप्रदेशमध्ये रिक्षा- बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात 7 महिलांचा जागीच मृत्यू

Latest News: या अपघातामध्ये सात महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात महिला गंभीर जखमी झाल्या.
Andhra Pradesh Accident News
Andhra Pradesh Accident Newssaam tv

Andhra Pradesh News: आंध्रप्रदेशमध्ये (Andhra Pradesh) ऑटो रिक्षा आणि बस यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात (auto rickshaw and bus accident) झाला. काकीनाडा जिल्ह्यात रविवारी दुपारी ही घटना घडली. या भीषण अपघातामध्ये सात महिलांचा जागीच मृत्यू झाला तर आणखी सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या 14 महिला एकाच रिक्षातून प्रवास करत होत्या.

Andhra Pradesh Accident News
Nagpur-Mumbai flight: आनंदाची बातमी! 20 मे पासून Air India ची नागपूर-मुंबई अतिरिक्त विमानसेवा, तिकिट दरही कमी होणार!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी दुपारी 3.30 च्या सुमारास झाला. महामार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका खासगी बसने तल्लारेवू बायपासजवळ ऑटोरिक्षाला जोरदार धडक दिली. ही बस यानमच्या दिशेने जात होती. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सात महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर सात महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातामध्ये बसचा चक्काचूर झाला आहे.

Andhra Pradesh Accident News
Chhattisgarh Accident News: राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअपचा भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

महत्वाचे म्हणजे, फक्त सात जण बसण्याची क्षमता असलेल्या रिक्षामधून 14 महिला प्रवास करत होत्या. या अपघातात जखमी झालेल्या सात महिलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. तर अपघातानंतर रिक्षाचालक फरार झाला. पोलिसांनी पुढे असे सांगितले की, ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या 14 महिलांपैकी 6 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पोलिसांनी पुढे सांगितले की, सर्व मृत आणि जखमी झालेल्या महिला या नजीकच्या नीलापल्ली गावामध्ये राहणाऱ्या आहेत. त्या कोळंबीच्या शेतात काम करणाऱ्या मजूर आहेत. या अपघातातील जखमी महिलांवर काकीनाडा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास आंध्रप्रदेश पोलिसांकडून सुरु आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com