Barabanki News : घाघरा नदीत आंघोळीसाठी गेलेले ५ जण बुडाले, शोध सुरु

5 kids dron in river : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील घाघरा नदीत आंघोळीसाठी गेलेले पाच जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
ghaghara river
ghaghara river Saam tv

Barabanki Latest News :

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील घाघरा नदीत आंघोळीसाठी गेलेले पाच जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. तर तिघांचा शोध सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, घाघरा नदीत बुडालेल्या मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांना शोधण्यासाठी स्थानिक खलाशांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. या घटनेची माहिती NDRFला देखील देण्यात आली आहे. टिकैतनगरच्या चिर्रा गावात ही घटना घडली आहे.

ghaghara river
Pune Crime News : पुण्यात दुचाकी चाेरणा-या बाणेर, वाकड, थेरगावातील युवकांना अटक, 11 वाहनांसह रिक्षा जप्त

नेमकं काय घडलं?

शनिवारी दुपारी चिर्रा गावातील २६ वर्षीय नूर आलम, १५ वर्षीय अहम राजा, १२ वर्षीय हमजा, शाफ अहमद आणि १० वर्षीय अमान हे एकूण पाच जण आंघोळीसाठी घाघरा नदी पात्रात गेले होते. यावेळी नदीत ५ जण बुडाले.

या घटनेची माहिती या मुलांच्या नातेवाईकांना सांगण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली. त्यानंतर गावातील शेकडो लोक नदीच्या दिशेने धावले. तसेच पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले.

स्थानिक खलाशांच्या प्रयत्नाने शाफ अहमद आणि अमान याचा मृतदेह बाहेर काढला आहे. तर इतरांचा शोध सुरु आहे. गावातील पाच जण पोहोण्यासाठी गेले होते, त्यावेळी अचानक हे पाच जण नदीत बुडाल्याची माहिती स्थानिक महिलेने दिली.

ghaghara river
Kolhapur Crime News: कोल्हापुरात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, गुंडाची टोळक्याकडून निर्घृण हत्या; VIDEO व्हायरल

पोलीस अधिकारी दिनेश सिंह यांनी सांगितलं की, 'घाघरा नदीत मुले आंघोळ करताना ही दुर्दैवी घटना घडली. यातील दोघांचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आली आहे. तर इतर तीन मुलांचा शोध सुरु आहे. या घटनेतील इतर लोकांचाही शोध होईल'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com