Congress MP's suspended : काँग्रेसचे ९ खासदार 'सस्पेंड'; कारवाई नेमकी कोणत्या कारणांमुळं झाली?

Five Congress Loksabha MP's suspended : काँग्रेसच्या एकूण ९ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
congress MP suspended parliament winter session
congress MP suspended parliament winter sessionSAAM TV
Published On

Nine Congress Loksabha MP's suspended :

काँग्रेसच्या एकूण नऊ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी त्यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या निलंबित खासदारांची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. लोकसभेच्या कामकाजादरम्यान गदारोळ आणि गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत ते कामकाजात सहभागी होऊ शकत नाहीत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीएन प्रतापन, हिबी इडन, एस. ज्योतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोस यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय आजच तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

संसदेच्या सुरक्षेत चूक (Parliament Security Breach) झाल्याच्या मुद्द्यावर गुरुवारी दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार गदारोळ झाला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या (Amit Shah) राजीनाम्याची मागणी लावून धरली.

congress MP suspended parliament winter session
Parliament Security Breach Update : संसदेतील घुसखोरीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई, 8 कर्मचारी सस्पेंड

लोकसभेतील (Loksabha) गदारोळामुळं दुपारी ३ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी तत्पूर्वी दोन्ही सभागृहांमध्ये संबोधन केले. त्यांनी सुरक्षा प्रोटोकॉल मजबूत करण्यासाठी बिगर राजकीय दृष्टीकोनाच्या आवश्यकतेवर अधिक भर दिला.

लोकसभा अध्यक्षांनी सर्वच नेत्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली आणि संसदेची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठीच्या सूचना ऐकून घेतल्या. काही सूचना आल्या होत्या, त्या आधीपासूनच लागू करण्यात आलेल्या आहेत. या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचं राजकारण करू नये, असं जोशी म्हणाले.

congress MP suspended parliament winter session
#shorts : Parliament Seurity Breach News : संसदेतील घुसखोर तरुणांवर काय कारवाई? पोलीस काय म्हणाले?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com