Fire News: देशभरात आगीच्या ३ मोठ्या घटना, आतापर्यंत ४५ जणांनी गमावले प्राण, अनेक जखमी

Rajkote Game Zone Fire: पहिली घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली असून इथे गेमिंग झोनमध्ये आग लागली होती. दुसरी घटना दिल्लीच्या विवेक विहारमध्ये घडली असून इथे बेबी केअर सेंटरला भीषण आग लागली होती. तर तिसरी घटना दिल्लीच्या कृष्णनगरमध्ये घडली असून इथे बिल्डिंगला आग लागली होती.
Fire News: देशभरात आगीच्या ३ मोठ्या घटना, आतापर्यंत 35  जणांनी गमावले प्राण, अनेक जखमी
India Fire Incident Saam Tv

देशभरामध्ये आगीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४५ जणांनी आपला जीव गमावल्याची माहिती समोर आली आहे. या आगीच्या घटनांमध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पहिली घटना गुजरातच्या राजकोटमध्ये घडली असून इथे गेमिंग झोनमध्ये आग (Rajkote Game Zone Fire) लागली होती. दुसरी घटना दिल्लीच्या विवेक विहारमध्ये घडली असून इथे बेबी केअर सेंटरला भीषण आग (Delhi Baby Care Center Fire) लागली होती. तर तिसरी घटना दिल्लीच्या कृष्णनगरमध्ये घडली असून इथे बिल्डिंगला आग लागली होती. या तिन्ही घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजकोट गेमिंग झोन आग -

गुजरातच्या राजकोटमधील एका शॉपिंग मॉलमधील गेमिंग झोनला शनिवारी अचानक आग लागली. या आगीच्या घटनेमध्ये १२ लहान मुलांसह ३५ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमध्ये अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फायर सेफ्टीसाठी कोणत्याही प्रकारची एनओसी न घेता हा गेम झोन सुरू होता. या गेम झोनमध्ये जवळपास १००० ते १५०० लिटर पेट्रोल आणि १५०० ते २००० लिटर डिझेल ठेवले होते.

Fire News: देशभरात आगीच्या ३ मोठ्या घटना, आतापर्यंत 35  जणांनी गमावले प्राण, अनेक जखमी
Gujarat Fire Accident: राजकोट गेमिंग झोन दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; PM मोदी हळहळले, पोस्ट करत व्यक्त केलं दु:ख

दिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग -

राजधानी दिल्लीतील विवेक विहारमध्ये असणाऱ्या बेबी केअर हॉस्पिटलला शनिवारी रात्री अचानक आग लागली. रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. या आगीमध्ये ७ बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, १२ बाळांना रेस्क्यू करण्यात आले आहे. यामधील ७ बाळांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक बाळ व्हेंटिलेटरवर आहे तर उर्वरीत बाळांवर इतर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

Fire News: देशभरात आगीच्या ३ मोठ्या घटना, आतापर्यंत 35  जणांनी गमावले प्राण, अनेक जखमी
Delhi Fire Accident : दिल्लीत बेबी केअर सेंटला भीषण आग, ६ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू, भयानक VIDEO

कृष्णनगरमध्ये बिल्डिंगला आग -

दिल्लीच्या कृष्णनगरमध्ये एका रहिवासी बिल्डिंगला अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने ७ जणांना सुरक्षित बाहेर काढले. या आगीमध्ये १० स्कूटी आणि बाइक जळून खाक झाल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री २.३० च्या सुमारास ही घटना घडली.

Fire News: देशभरात आगीच्या ३ मोठ्या घटना, आतापर्यंत 35  जणांनी गमावले प्राण, अनेक जखमी
UP Road Accident: देवदर्शनाला निघाले पण वाटेतच काळाची झडप; ट्रक-बस अपघातात ११ भाविकांचा जागीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com