Explosion On Petrol Pump: पेट्रोल पंपावर भीषण स्फोट, २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू; १०० पेक्षा अधिक जखमी

Russia Fire News: स्फोट झाल्यानंतर पेट्रोल पंपाला लागलेली आग काही क्षणातच ६०० मीटरपर्यंत पसरत गेली.
Explosion On Petrol Pump
Explosion On Petrol PumpSaam Tv
Published On

Russia News: रशियाच्या (Russia) दक्षिणेकडील दागेस्तानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. याठिकाणी पेट्रोल पंपावर झालेल्या भीषण स्फोटात (massive explosion at russia petrol pump) २७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. या स्फोटामध्ये 100 हून अधिक जण जखमी झालेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

Explosion On Petrol Pump
PM Modi Speech : PM मोदींनी सुप्रीम कोर्टावर केलं मोठं वक्तव्य; ऐकताच सरन्यायाधीशांनी हसत-हसत जोडले हात

मिळालेल्या माहितीनुसार, कॅस्पियन समुद्राच्या किनार्‍यावर प्रादेशिक राजधानी मखचकला येथे सोमवारी स्थानिक वेळेनुसार रात्री ९.४० च्या सुमारास पेट्रोल पंपावर भीषण स्फोट झाला. या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटानंतर पेट्रोल पंपाला भीषण आग लागली. धुराचे लोट आसपासच्या परिसरात पसरलेत. स्फोट झाल्यानंतर पेट्रोल पंपाला लागलेली आग काही क्षणातच ६०० मीटरपर्यंत पसरत गेली.

Explosion On Petrol Pump
77th Independence Day: PM मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनतेला दिली 5 मोठी आश्वासने, म्हणाले...

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग विझवली. या भीषण स्फोटामध्ये जखमी झालेल्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना विमानाद्वारे मास्कोमध्ये उपचारासाठी हालवण्यात येणार आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Explosion On Petrol Pump
India Become The Second Biggest Mobile Phone Producing : भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फोन उत्पादक, 200 मिलियन युनिटचा आकडा पार

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सुमारे 260 आपत्कालीन कर्मचारी तैनात करण्यात आले होते. ही आग 600 स्क्वेअर मीटर परिसरात पसरल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन वृत्तपत्र Izvestia ने दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रोल पंपाच्यासमोरील कार पार्किंगमध्ये ही आग लागली. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 'स्फोटानंतर आम्हाला काहीच दिसत नव्हते.'

रशियाचे उप आरोग्य मंत्री व्लादिमीर फिसेन्को यांनी सांगितले की, 'जखमींपैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. इंटरफॅक्सने दागेस्तानी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की, जखमींमध्ये 13 मुलांचा समावेश आहे. रशियाच्या आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाने टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर सांगितले की,'गंभीर जखमींना मॉस्कोला नेण्यासाठी मखचकला येथे विमान पाठवण्यात आले आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com