India Become The Second Biggest Mobile Phone Producing : भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा फोन उत्पादक, 200 मिलियन युनिटचा आकडा पार

Mobile Phone Producing : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. फोन उत्पादनात देश आघाडीची भूमिका बजावत आहे.
India Become The Second Biggest Mobile Phone Producing
India Become The Second Biggest Mobile Phone ProducingSaam Tv
Published On

Second Biggest Mobile Phone Producing Country : तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत प्रगतीच्या मार्गावर आहे. फोन उत्पादनात देश आघाडीची भूमिका बजावत आहे. भारत आता जगातील दुसरा सर्वात मोठा फोन उत्पादक देश बनला आहे. देशात स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत.

सॅमसंग ते नथिंग पर्यंतचे स्मार्टफोन मेड इन इंडिया आहेत

भारतात स्मार्टफोन (Smartphone) निर्मितीचे युग फार पूर्वीपासून सुरू झाले आहे. स्मार्टफोन उत्पादनात देशाने खूप पुढे मजल मारली आहे. Samsung, Apple, Xiaomi, Oppo, Nothing या लोकप्रिय स्मार्टफोन कंपन्यांचे स्मार्टफोन भारतात बनवले जात आहेत.

India Become The Second Biggest Mobile Phone Producing
Upcoming Smartphone Launches in August 2023 : स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करताय? वनप्लस ते सॅमसंग...,ऑगस्ट महिन्यात लॉन्च होणाऱ्या फोनची लिस्ट पाहा

या काउंटरपॉइंट रिसर्चचा नवीन अहवाल (Report) समोर आला आहे. या अहवालानुसार, आता भारतातील फोन निर्मितीचा हा आकडा 2 अब्ज म्हणजेच 200 कोटींचा आकडा पार केला आहे. अहवालानुसार शिपमेंटने 23% ची CAGR नोंदवली आहे.

काउंटरपॉईंट रिसर्चच्या या अहवालात मेक इन इंडिया, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह आणि आत्मनिर्भर भारत यांसारख्या सरकारच्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे.

स्थानिक मागणी चांगल्या पद्धतीने पूर्ण केली जात आहे

काउंटरपॉइंट रिसर्चचे संचालक तरुण पाठक यांच्या मते, देशातील स्थानिक उत्पादनात वर्षानुवर्षे वाढ होत आहे. देशातील स्थानिक उत्पादनामुळे स्थानिक मागणी अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येऊ शकते.

India Become The Second Biggest Mobile Phone Producing
Mobile Network Issue | घरात एकाच ठिकाणी मोबाईलला मिळत फुल्ल नेटवर्क?

2022 मध्ये, भारतीय बाजारपेठांमध्ये मेड इन इंडिया (Made In India) उपकरणांची शिपमेंट 98 टक्क्यांहून अधिक झाली आहे. 2014 मध्ये हा आकडा केवळ 19 टक्के होता.

मेक इन इंडियामुळे तंत्रज्ञान क्षेत्राला नवी वाट मिळाली

देशातील मेक इन इंडिया उपक्रमाबद्दल बोलताना, सरकारने या उपक्रमात टप्प्याटप्प्याने उत्पादन कार्यक्रमाची स्थापना केली आहे. सरकारने देशाबाहेर उत्पादित युनिट्सवर आयात शुल्क वाढवून स्थानिक उत्पादनाला प्रोत्साहन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com