ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरात बसून लोक मनोरंजनासाठी मोबाईलवर टाईमपास करत बसतात.
घरात एखाद्या रुममध्ये, किंवा एखाद्या खिडकीतच चांगली रेंज मिळते. मात्र, दुसरीकडे आजिबातच नेटवर्क मिळत नाही.
अशा वेळी केवळ कॉल करण्यासाठीही उठून दुसरीकडं जावं लागतं. तुमच्याही घरात अशीच समस्या असेल, तर या टिप्स फॉलो करा.
तुमच्या फोनमध्ये जर 2G किंवा 3G नेटवर्क सुरू असेल तर तुम्हाला सगळीकडे नेटवर्क मिळू शकत नाही. यामुळे तुमच्या फोनची नेटवर्क सेटिंग 4G किंवा 5G करुन घ्या.
तुमच्या फोनला घरामध्ये आजिबातच नेटवर्क नसेल, तर फोन एका काचेच्या ग्लासमध्ये ठेवा. यानंतर तुम्हाला काही प्रमाणात नेटवर्क मिळेल.
बाजारात नेटवर्क बूस्टर नावाचं डिव्हाईस मिळतं. यालाच सिग्नल बूस्टरही मिळतात. 2 हजार रुपये खर्च करून तुम्हाला संपूर्ण घरामध्ये नेटवर्क मिळू शकतं.
तुमच्याकडे असलेल्या सिम कंपनीचा टॉवर तुमच्या घराजवळ नसेल. यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्या सिमकार्डला चांगली रेंज मिळते हे तपासून त्या कंपनीकडे तुमचा नंबर पोर्ट करून घेऊ शकता.