रशिया-युक्रेन युध्दात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात युक्रेनमध्ये अडकलेतं. या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. काल रशियाने युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी 6 तास युध्द थांवण्याची माहिती आली होती.
आजही भारतीयांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी 130 बस तयार ठेवल्या आहेत. युक्रेनमधील खार्किव आणि सुमी येथून भारतीय विद्यार्थ्यांना आणि इतर परदेशी नागरिकांना रशियाच्या बेलगोरोड प्रदेशात नेण्यासाठी 130 रशियन बसेस तयार आहेत. अशी माहिती रशियन नॅशनल डिफेन्स कंट्रोल सेंटरचे प्रमुख कर्नल जनरल मिखाईल मिजिंटसेव यांनी दिली.
भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रशिया 6 तासांसाठी युद्ध थांबवणार
भारताच्या सांगण्यावरून रशियाने युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. रशियाने खार्किवमधील युद्ध 6 तासांसाठी थांबवण्याचे मान्य केले आहे, जेणेकरून तेथे अडकलेले सर्व भारतीय विद्यार्थी आणि नागरिक तात्काळ तेथून निघू शकतील.
रशियाने (Russia) खार्किवमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या लष्कराकडून मानवी ढाल बनवल्याचा आरोप होत असताना भारतीय जनतेसाठी दिलासा देणारी बातमी आहे. खार्किवमधून युक्रेनच्या आसपासच्या देशांच्या सीमेवर अडकलेल्या भारतीय लोकांना बाहेर काढण्यासाठी ६ तासांचा कालावधी देण्यात येत असल्याचे रशियाचे म्हणणे आहे.
युक्रेनमधील इनरडोहार शहरातील अणूऊर्जा प्रकल्पाला आग लागली आहे. हा अणु उर्जा प्रकल्प युरोप मधील सर्वात मोठा प्रकल्प आहे. युक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा हल्ला रशियाने केल्याचे म्हटले आहे. त्यांनी जगाला मदतीचे आवाहन केले आहे.
रशियन (Russia) सैन्य जाणूनबुजून अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करत असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. चेर्नोबिल अणुदुर्घटनेचा संदर्भ त्यांनी दिला आहे. 'झापोरिझियाच्या सहा अणुभट्ट्यांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. असही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.
Edited by- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.