Russia Ukraine War : युक्रेनच्या अणु उर्जा प्रकल्पाला भीषण आग

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा हल्ला रशियाने केल्याचे म्हटले आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarSaam Tv
Published On

Russia Ukraine War : युक्रेनमधील इनरडोहार शहरातील अणूऊर्जा प्रकल्पाला आग लागल्याची माहिती मिळत आहे. हा अणु उर्जा प्रकल्प युरोप मधील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे बोललं जात आहे. युक्रेनचे (Ukraine) राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हा हल्ला रशियाने केल्याचे म्हटले आहे. त्यांनी जगाला मदतीचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात युरोपातील सर्वात मोठा अणु प्रकल्प धोक्यात असल्याचे म्हटले आहे.

रशियन (Russia) सैन्य जाणूनबुजून अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करत असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. चेर्नोबिल अणुदुर्घटनेचा संदर्भ त्यांनी दिला आहे. 'झापोरिझियाच्या सहा अणुभट्ट्यांमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे परिणाम वाईट होतील. असही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

Russia Ukraine War
Russia-Ukraine: युक्रेनहून येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्याला लागली गोळी; उपचारासाठी हलवलं, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

अशीच आग चेर्नोबिल आण्विक प्रकल्पामध्ये लागली होती. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता व्यक्त केली आहे. चेर्नोबिल दुर्घटनेसारखी परिस्थिती उद्भवू शकते असे त्यांनी म्हटले आहे. वास्तविक ही ती आण्विक दुर्घटना होती ज्यात युक्रेनमधील 1.25 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेचा परिणाम चेर्नोबिल आणि आजूबाजूच्या परिसरावर अजूनही दिसून येत आहे. असही झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे.

नऊ दिवसांपासून रशिया युक्रेनमध्ये युध्द सुरु

मागिल नऊ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये युध्द सुरु आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक प्रमुख शहरांवर हल्ले केले आहेत. अजुनही हे हल्ले रशियाने सुरुच ठेवले आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीव या शहरावर जास्त हल्ले केले आहेत. युक्रेनमधील दहा लाख नागरिकांनी देश सोडल्याची माहिती मिळत आहे. युरोपमधील शेजारील देशात नागरिकांनी स्थलांतर केलं आहे.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com