इंदुरमध्ये सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल सोमवारी (१३ मे) दुपारी जाहीर झाला होता. त्यानंतर १२ वीच्या विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. हा विद्यार्थी इंदुरमधील महू कोतवाली परिसरात पटेल बेकरीजवळ राहत असल्याची माहिती टाईम्स ऑफ इंडियाच्या हवाल्यानुसार मिळत आहे. या विद्यार्थ्याचं नाव आर्यन आहे तर त्याच्या वडिलांचं नाव विजय पाल आहे. तो गुजरखेडा गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर आर्यनने (12th Student) स्वत:ला घरातील बाथरूममध्ये कोंडून घेतलं. त्यानंतर विषारी द्रव्य प्राशन केलं. तो बराच वेळ बाथरूममध्ये असल्याचं पालकांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी बाथरूमचा दरवाजा सोडला. तेव्हा आतमध्ये आर्यन बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यांनी त्याला तात्काळ महू सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. तेथून त्याला इंदोरला रेफर करण्यात आलं होतं. परंतु, त्याचा उपचारादरम्यान १४ मे रोजी मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
एएसपी द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला (12th CBSE Results) आहे. चांगले गुण मिळाले नसल्यामुळे त्याने आत्महत्या (End Life) केल्याची शक्यता वर्तिविली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, आर्यनच्या आत्महत्येमागील नेमकं कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या पालकांचे जबाब नोंदवायचे आहेत.
कमी गुण मिळाल्यामुळे आर्यनने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहे. आर्यनच्या मृत्युने त्याच्या पालकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दहावी बारावीचा निकाल आल्यानंतर अनेकदा विद्यार्थी आत्महत्या करत असल्याचं समोर येतं. इंदुरमधील (Indore) ही घटना देखील अशीच धक्कादायक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.