नवी दिल्ली: जर तुमचे सप्टेंबर महिन्यात बँकांमध्ये कामे असतील तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण सप्टेंबर महिन्यात बँकांना (Bank) १२ दिवसांपेक्षा जास्त दिवस सुट्ट्या आहेत. सध्या डिजिटल युगात घरबसल्या बँकांची अनेक कामे होतात. पण, अशी अनेक कामे आहेत, ती बँकेत गेल्याशिवाय पूर्ण करता येत नाहीत. काहींना होम लोनसाठी तसेच वेगवेगळ्या कर्जांसाठी बँकेत जावे लागते, त्यामुळे बँकेांना (Bank) सुट्ट्या कधी आहेत, याची यादी पाहणे महत्वाचे आहे.
पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये, सुमारे १३ दिवस बँका बंद राहतील. तसेच ऑगस्टमधील शेवटचे काही दिवस बँकांना (Bank) सुट्टी असणार आहे. चौथा शनिवार २७ ऑगस्ट रोजी आणि दुसऱ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी रविवार आहे, त्यामुळे हे दोन दिवस सुट्टीचे असणार आहेत. यानंतर दुसऱ्या दिवशी २९ ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव तिथी आहे. आसाममधील गुवाहाटीमध्ये या दिवशी बँका बंद राहतील. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी ३१ ऑगस्ट रोजी बँका बंद राहतील. (Bank Holidays)
देशात राज्यानुसार सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात शनिवार आणि रविवार असे १८ दिवस आहेत. तर सप्टेंबर महिन्यात बँकांना (Bank) १३ दिवस सुट्या आहेत.
१ सप्टेंबर २०२२ – गणेश चतुर्थीनिमित्त बँकेला सुट्टी असणार आहे. ४ सप्टेंबर २०२२ - रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे, ६ सप्टेंबर २०२२ - झारखंडमध्ये विश्वकर्मा पूजेनिमित्त बँका बंद राहणार. ७ आणि ८ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम, कोची येथे ओणमनिमित्त बँका बंद असणार आहेत. ९ सप्टेंबर - गंगटोकमध्ये इंद्रजातावर बँकांना सुट्टी राहणार.
१० सप्टेंबर श्री नरवणे गुरु जयंतीनिमित्त तिरुअनंतपुरम, कोची येथे बँक सुट्टी असणार आहे. ११ सप्टेंबर रविवार साप्ताहिक सुट्टी आहे. तर १८ सप्टेंबर रोजी रविवारमुळे बँका बंद राहतील. २१ सप्टेंबर श्री नारायण गुरु समाधी दिनानिमित्त तिरुवनंतपुरम, कोची येथे बँका (Bank) बंद राहतील. २४ सप्टेंबर चौथ्या शनिवारमुळे बँकांना सुट्टी असणार आहे. तर २५ सप्टेंबरला रविवारी साप्ताहिक सुट्टी. आणि २६ सप्टेंबर रोजी - जयपूर आणि इम्फाळमध्ये नवरात्रीच्या स्थापनेला बँकांना सुट्टी आहे. (Bank Holidays)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.