पश्चिम महाराष्ट्र हादरला! मध्यरात्री भूकंपाचे धक्के, अल्लमट्टी धरणाजवळ केंद्रबिंदू

आज पहाटे २.२१ च्या सुमारास कोल्हापूरपासून १७१ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ इतकी होती.
Earthquake in Western Maharashtra, kolhapur, karnataka
Earthquake in Western Maharashtra, kolhapur, karnatakasaam TV

कोल्हापूर: आज पहाटे २.२१ च्या सुमारास कोल्हापूरपासून (kolhapur) १७१ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती. कोल्हापुरात सकाळी १२:०५ वाजता ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याची खोली जमिनीच्या खाली ५ किमी होती.

या भूकंपाचा (Earthquake) केंद्रबिंदू कोल्हापूरच्या पूर्वेला १७१ किलोमीटरवर आहे. यात कोणतीही हानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.केंद्रबिंदू कर्नाटकातील विजापूरजवळ आहे, अल्लमट्टी धरणाच्या जवळ केंद्रबिंदू असल्याने भीतीच वातावरण आहे.

Earthquake in Western Maharashtra, kolhapur, karnataka
Petrol Diesel Prices: जागतिक बाजारात कच्चे तेल झाले स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार?

आज पहाटे ३.२८ वाजता जम्मू-काश्मीरमधील कटरा येथून ६२ किमी अंतरावर भूकंपाचे धक्के जाणवले, याची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली ५ किमी होती. गेल्या तीन दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याची ही सातवी वेळ आहे.

याशिवाय आज पहाटे २.५५ च्या सुमारास काबुल, अफगाणिस्तानपासून १६४ किमी अंतरावर ४.३ तीव्रतेचे भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले, याची खोली जमिनीखाली ८० किमी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ११:०४ वाजता जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे ४.१ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू ३३.२० अंश उत्तर अक्षांश आणि ७५.५६ अंश पूर्व रेखांश जमिनीपासून ५ किमी खोलीवर होता.

Earthquake in Western Maharashtra, kolhapur, karnataka
Asia Cup च्या पुर्वसंध्येला विराटला धोनीची आठवण; भावनिक ट्विट करत म्हणाला, या व्यक्तीचा विश्वासू...

जम्मू-काश्मीरच्या कटरा पूर्वेला मंगळवारी पहाटे २:२० वाजता पहिला भूकंपाचा धक्का जाणवला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ इतकी होती, जमिनीच्या खाली १० किमी खोली होती. तसेच डोडापासून ९.५ किमी ईशान्येस दुपारी ३.२१ वाजता २.६ रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप झाला. मंगळवारी पहाटे ३.४४ वाजता जम्मू भागातील उधमपूरपासून २९ किमी पूर्वेला २.८ रिश्टर स्केलचा तिसरा भूकंप झाला. बुधवारी सकाळी ८.०३ वाजता उधमपूरपासून २६ किमी आग्नेय दिशेला २.९ रिश्टर स्केलचा चौथा भूकंप झाला. जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळीही भूकंपाचे दोन धक्के जाणवले. यानंतर शुक्रवारी पहाटे ७ वा भूकंपाचा धक्का जाणवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com