ZP भरती परीक्षेबाबतची ऑडियो क्लिप व्हायरल; गिरीश महाजनांवर गंभीर आरोप

'तुम्हाला काही कामं नाहीत का रे, दिवसरातून ५०० फोन लावता, मी काही करत नाही ती रद्द झाली.'
Girish Mahajan Viral Audio Clip
Girish Mahajan Viral Audio ClipSaam TV
Published On

प्राची कुलकर्णी -

पुणे: जिल्हा परिषद भरती परीक्षेबाबतची सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमधील आवाज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवाय या क्लिपमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांशी अर्वाच्च भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. ती व्यक्ती महाजन असल्याचा आरोप करण्यात येतोय.

व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये (Viral Audio Clip) एक विद्यार्थी झेडपीची फाईल तुमच्याकडे आली असून ती पाठवा ना साहेब, मुलं खूप डिप्रेशनमध्ये आहेत.' त्यावरती समोरील व्यक्ती जी महाजन असल्याचा आरोप केला जात आहे.

ते म्हणतायत, 'तुम्हाला काही कामं नाहीत का रे, दिवसरातून ५०० फोन लावता, मी काही करत नाही ती रद्द झाली, असं म्हणतायत. त्यावर समोरचा मुलगा 'अहो साहेब मुलं डिप्रेशनमध्ये आहेत, असं म्हणतोय त्यावर पुन्हा समोरुन 'रद्द केली, ती ठेव फोन, असं बोलणारी व्यक्ती ही मंत्री गिरीष महाजन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण

ऑडियो क्लिपमध्ये (Audio Clip) संबंधित व्यक्ती विद्यार्थांना जिल्हा परिषद आरोग्य भरती रद्द केल्याचं सांगत आहे. जी परीक्षेचं काम न्यासाकडे होतं. परीक्षा पेपरफुटी घोटाळ्यानंतर परीक्षा लांबणीवर पडली होती. मात्र, नंतर परीक्षा कधी याचं स्पष्टीकरण मिळत नसल्याने परीक्षार्थी अस्वस्थ आहेत.

शिवाय पैसे आणि फॉर्म भरून वर्ष होत आलं तरी परीक्षा झालेली नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी मंत्र्यांना फोन केल्यानंतर हा प्रकार घडला असल्याचा दावा करण्यात येत आहे. या व्हायरल होणाऱ्या ऑडियो क्लिपची पुष्टी साम टीव्ही करत नाहीये.

...तर राज्यव्यापी आंदोलन करु - स्पर्धा परीक्षा समन्वय समिती

Girish Mahajan Viral Audio Clip
उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपला ललकारलं; म्हणाले, हिंमत असेल तर...

दरम्यान, २०१९ च्या जिल्हा परिषद भरतीबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे विद्यार्थ्यासोबत संभाषण, जर हा आवाज गिरीष महाजनांचा असेल तर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती तर्फे त्यांचा जाहीर निषेध. चार वर्षांपासून भरतीची मागण्या करणाऱ्या बेरोजगार तरूनासोबत या प्रकारची भाषा सहन केली जाणार नाही.

सत्ताधाऱ्यांना विनंतीची भाषा समजत नसेल तर येत्या ५-७ दिवसात भव्य मोर्चा आणि राज्यव्यापी आंदोलनाची चाचपणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती मार्फत केली जात आहे तसेच येत्या सोमवारी ZP भरतीसाठी ट्विटर वॉर आयोजित केला गेला आहे त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असं आवाहन स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com