उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपला ललकारलं; म्हणाले, हिंमत असेल तर...

भुजबळसाहेबांनी शिवसेना सोडली नसती तर तेच मुख्यमंत्री झाले असते - ठाकरे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySaam Tv

रश्मी पुराणिक -

मुंबई: मलाच सगळं पाहिजे, प्रतिस्पर्धी नको अशी धारणा सत्ताधाऱ्यांची आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं, हिंमत असेल तर मैदानात या, माझी तयारी आहे असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला आव्हान दिलं आहे.

ते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना ७५ वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी भुजबळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला, ठाकरे म्हणाले, भुजबळसाहेबांनी शिवसेना सोडली नसती तर तेच मुख्यमंत्री झाले असते, ते सरकार वाचवण्यात वाकबगार आहेत हे तेव्हा सांगितलं असतं तर मी पण कामाला लावलं असतं अशी मिश्कील टिप्पणी यावेळी ठाकरेंनी केली.

पाहा व्हिडीओ -

शिवाय भुजबळ गेल्यावर मला आणि बाळासाहेबांना वाईट वाटलं घरातील माणूस जातो त्यावेळी त्यातून सावरायला वेळ लागतो असंही ठाकरे म्हणाले. तर भुजबळ यांना दोन नायक लाभले एका बाजूला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार.

मात्र, त्यांनी या नायकांचा दुरुपयोग केला नाही तर मार्गदर्शन घेतलं. एक नवीन समीकरण महाराष्ट्रात जन्माला घातलं. हे समीकरण यशस्वीपणे चालवून दाखवलं ते बघितल्यावर पोटात भीती येणे साहजिक आहे असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

तसंच हल्ली कोणी काहीही बोलत, कोणी काय बोलल की हक्कभंग म्हणून प्रस्ताव द्यायचा, विचाराने राजकारण करणं गरज आहे. मला सगळं पाहिजे प्रतिस्पर्धी नको. प्रत्येक गोष्ट कोर्टात जावं लागतं. हिंमत असेल तर मैदानात या, माझी तयारी आहे. मला मैदान कसे मिळणार नाही हे पाहतात. मात्र, एकदा मैदानात या होऊन जाऊ दे जे व्हायचं ते मी तर लढाईच्या क्षणाची वाट बघतोय, माझ्याबरोबर सगळे आहेत त्यामुळे मी लढणारच असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com