

अजय दुधाने
बदलापूर : एका तरुणाने भरधाव एक्सप्रेस समोर उडी मारल्याची घटना आज दुपारी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात घडली. यावेळी तिथे उपस्थित रेल्वे पोलिसाने जीव धोक्यात घालून या तरुणाला रेल्वे रुळातून बाजूला केलं. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कुमार गुरुनाथ पुजारी असं रेल्वे रुळात उडी मारणाऱ्या १८ वर्षीय तरुणाचं नाव असून तो उल्हासनगरच्या प्रेमनगर टेकडी भागात राहणाऱ्या आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कुमार पुजारी हा विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर येऊन उभा राहिला.
यावेळी कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी एक्सप्रेस भरधाव वेगात येताना पाहून कुमार याने अचानक रेल्वे रुळात उडी मारली आणि एक्सप्रेस समोर उभा राहिला. ही बाब तिथल्या रेल्वे पोलिसांना दिसताच येताच रेल्वे पोलिसांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत रेल्वे उडी घेतली आणि या तरुणाला रुळातून बाजूला केलं.
हे देखील पहा-
ऋषिकेश चंद्रकांत माने असं या तरुणाला वाचवणाऱ्या रेल्वे पोलीस जवानाचं नाव असून त्याच्या धाडसाचं यानंतर कौतुक होतंय. दरम्यान, कुमार पुजारी याने कौटुंबिक वादविवादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस पुढील तपास करतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.