कुर्ला: मुंबईच्या कुर्ला स्टेशनवर लोकल ट्रेन समोर एक व्यक्तीने उडी मारून आत्महत्या केली आहे. हा सगळा प्रकार त्याठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मुंबईची लोकल ट्रेनला मुंबईकरांची जीवनरेखा मानली जाते. मुंबईकर या लोकल ट्रेनचा वापर यासाठी करतात जेणेकरून ते सहज कमी वेळात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतील. अशा प्रकारे मुंबईची लाईफ लाईन आहे.
आता आयुष्यात निराश झालेल्या लोकांसाठी आत्महत्येचे ठिकाण बनत आहे. बरेचदा लोकल ट्रेन समोर उडी मारून आत्महत्या केल्याचे दिसून येते. मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशनवर अशीच एक घटना समोर आली आहे. 15 ऑगस्ट दुपारी 12 वाजेच्या सुमारास धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्या तरुणाची ओळख अद्याप पटली नाही.
स्टेशनवरील तिसरा डोळा, म्हणजेच सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे. फुटेजमधून या घटनेची तिव्रता लक्षात येईल. एक व्यक्ती स्टेशनवर उभी होती, ट्रेन जवळ येताच, त्या व्यक्तीने रुळावर उडी मारली आणि ट्रेनचे चार डबे त्याच्या अंगावरून गेले आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. कुर्ला जीआरपीने अपघाती मृत्यूची नोंद केली आहे पुढील तपास करत आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.