

अभिजीत देशमुख, कल्याण
Kalyan News: चोर समजून तरुणाला बेदम मारहाण (Beaten By Mob) केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.
याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात (Khadakpada Police Station) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्ररकरणाचा तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ तारखेला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास करु सिंह नावाचा तरुण आंबिवली रेल्वे स्टेशन येथून घरी जात होता. त्याचवेळी आंबिवली इराणीनगर परिसरात चार ते पाच तरुणांनी त्याला अडवले. चोरी करत असल्याचा संशयावरून या तरुणांनी करूला लाकडी स्टंप आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तरुणांनी केलेल्या मारहाणीमध्ये करु सिंह हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. करु सिंह कल्याणजवळ असलेल्या मोहनी अटळी परिसरात राहतो. याप्रकरणी करु सिंहने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गोरख, सुभाष आणि चंदू या तीन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.