Pune News: Young Bike Rider Crushed Under A Dumper Died On Spot In Pune Shivaji Road Rameshwar Chowk
Pune News: Young Bike Rider Crushed Under A Dumper Died On Spot In Pune Shivaji Road Rameshwar ChowkSaam Tv

Pune Accident News: नो एन्ट्रीमधून दुचाकीस्वार घुसला, जीवानिशी गेला दुसराच; डम्परखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Bike Accident: पुण्यात शिवाजी स्त्यावरील रामेश्वर चौकात एका डंपरच्या चाकाखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. एका दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे अपघात घडल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
Published on

Pune Accident News:

दुचाकी वाहन चालकांकडून वाहतुकीचे सर्व नियम धब्ब्यावर बसवतात. वाहतुकीचे हे नियमांचे उल्लंघन करणं एका दुचाकीस्वाराच्या जीवाशी आलं. नो एन्ट्री असतानाही दुचाकी नेल्याने दुसऱ्या एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील रामेश्वर चौकात घडलीय. शहरातील शिवाजी स्त्यावर असलेल्या रामेश्वर चौकात एका डंपरच्या चाकाखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय.(Latest News)

एका दुचाकीस्वाराच्या (Bike) चुकीमुळे अपघात घडल्याचं सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये दिसत आहे. एकाने नो एन्ट्रीमधून दुचाकी आणल्याने दुसऱ्या एकाचा मृत्यू झालाय. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधिक तपास पोलीस करत आहेत. अपघातात मृत झालेला हा दुचाकीस्वार कोण आहे याची ओळख पटलेली नाही. अपघातात (Accident) मृत झालेला तरुण डम्परच्या (dumper) मागून त्याला ओव्हर टेक करत होता. त्याचवेळी नो एन्ट्री असलेल्या ठिकाणातून एकाने मुख्य रस्त्यावर दुचाकी आणली. समोर दुचाकी आलेली पाहिल्यानंतर मृत पावलेल्या तरुणाने आपली बाईक थांबवली. पण त्याचा तोल गेला. त्याचवेळी त्या मागून डम्पर आला आणि त्याच्या डोक्यावरून डम्परचं चाक गेले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कार - दुचाकीच्या धडकेत दोन तरूणांचा मृत्यू

अर्धापूर- नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील श्रीसंत किसन बापू आश्रमाजवळ घडला . या अपघातात नांदेड शहरातील किशन मोरे आणि हरिश गट्टाणी या तरुणांचा मृत्यू झाला. हे दोघेजण रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने पार्डीकडून अर्धापुरकडे येत होते. श्रीसंत किशनबापू आश्रमाजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Pune News: Young Bike Rider Crushed Under A Dumper Died On Spot In Pune Shivaji Road Rameshwar Chowk
Nitin Gadkari Interview : वर्षभरात 5,00000 अपघात, देशाच्या GDP चे 3 टक्के नुकसान; नितीन गडकरी असं का म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com