Mumbai Fire : विंडो एसीने घात केला, हायप्रोफाईल एरियात इमारतीला लागली आग, महिलेचा मृत्यू

Mumbai Latest News Update : मुंबई अंधेरी लोखंडवाला येथील ब्रोकलँड इमारतीत विंडो एसी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू, अनेक जखमी.
Mumbai Fire
Mumbai FireSaam TV News
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Fire News : मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरू झालेल्या आगीच्या दुर्घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. आज शनिवारी पहाटे अडीच पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला या उच्चभ्रू वस्तीतील ब्रोकलँड इमारतीला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत एकूण सात जण जखमी झाले होते. जखमींवर अंधेरी पश्चिमेकडील कोकिळाबेन अंबानी रुग्णालय, महापालिकेचे विलेपार्ले येथील कूपर रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी पैकी अभिना कार्तिक या 34 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर उर्वरित रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यात दोन लहान मुलांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोन वाजून 40 मिनिटांनी अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला अशोका स्कूल मार्ग येथील ब्रोक लँड इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लेव्हल वन दर्जाची आग लागली. ब्रोकलँड ही आठ मजल्याची इमारत असून इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर निर्माण झाला आणि या धूरामुळे पहिल्या मजल्यावरून फ्लॅट क्रमांक 104 मध्ये असलेल्या महिला पुरुष आणि लहान मुलांना श्वास घेण्यास त्रास झाला गुदमरल्यामुळे ते बेशुद्ध पडले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होऊन जखमी व्यक्तींना चार बंगला येथील कोकिळाबेन अंबानी रुग्णालय जोगेश्वरी पूर्वेकडील ट्रॉमा केअर रुग्णालय आणि महापालिकेच्या विलेपार्ले पश्चिमेकडील कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Mumbai Fire
IED Attack : पाकिस्तानी सैनिकांवर मोठा हल्ला, १० जणांचा जागीच मृत्यू

तळमजला आणि पहिल्या मजल्यावर असलेल्या स्पिल्ट एसी विंडो एसी आणि त्यातील वायरिंग मध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आग लागली. या आगीमुळे घरातील लाकडी फर्निचर कागदपत्रे कपडे गाद्या आणि घरातील इतर सामान मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले. घरातील गाद्या आणि कपडे पेटल्यामुळे घरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरू लागल्याने घरातील सात जण आणि तीन पाळीव प्राणी श्वास गुदमरून जखमी झाले आहेत. सर्व जखमींना 108 ॲम्बुलन्स आणि खासगी वाहनांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Mumbai Fire
Amrit Bharat Express : मुंबईला मिळाली नवी ट्रेन, तिकिट किती, कुठे जाणार, कुठे कुठे थांबणार?

जखमींपैकी अपर्णा गुप्ता (41 वर्ष), दया गुप्ता (21 वर्षे पुरुष), रिहान गुप्ता (तीन वर्षाचा मुलगा), पद्युमन गुप्ता (१० दिवसाचे लहान मुल) या दोघांवर कोकिळाबेन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आभीना कार्तिक संजना वालिया (34 वर्षीय महिला) यांना देखील धुरामुळे त्रास झाल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारादरम्यान आभीनाचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Fire
Maharashtra 12th Result Date: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट

कार्तिक संजय वालिया चाळीस वर्षे पुरुष धुराचा त्रास झाल्यामुळे श्वास घेण्यास अडचण झाल्यामुळे त्यांना महापालिकेच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत कुपन रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कार्तिक यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तर पोलम गुप्ता 40 वर्षीय तरुणावर महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सद्य स्थिर असल्याचे समजते. शिवाय पहिल्या मजल्यावर असणाऱ्या दोन पाळीव श्वान आणि एका पाळीव मांजरीला देखील धुराचा त्रास झाल्याने श्वास घेण्यास अडचण झाली आहे त्यामुळे त्यांच्यावर देखील प्राणी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com