औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) 2 एप्रिलला पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुस्लिम धर्मियांच्या मशिदीवर भोंगे लावून अजान अदा करण्यावर प्रश्न उपस्थित करून जोरदार आक्षेप घेतला. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राजकारण चांगलेच ढवळून निघाले. राज यांच्या या भूमिकेला महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांनी जोरदार विरोध केला. तसेच राज ठाकरे राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत असल्याचा आरोपही करण्यात आला.
हे देखील पहा :
मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोरच लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याची भूमिका राज ठाकरेंनी घेतली. यावरून वादंग सुरु झाल्यानंतर व राज ठाकरेंवर जोरदार टीका झाल्यावर राज यांनी ठाण्यात 'उत्तर सभा' घेऊन महविकास आघाडीच्या नेत्यांना प्रत्युत्तर देत जोरदार निशाणेबाजी केली. या सर्व घडामोडी घडत असतानाच मनसेच्या अनेक मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षास जय महाराष्ट्र केला.
राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत एमआयएमचे (AIMIM) औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल (Imtiaz Jalil) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत इशारा दिलाय. जलील म्हणाले, रमजानचा महिना संपल्यावर राज ठाकरेंना आम्ही उत्तर देऊ. कारण, मुस्लिमांसाठी (Muslim) हा पवित्र महिना आहे. औरंगाबाद मध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवेळी आणि काल आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीवेळी मशिदी समोर डीजे बंद करण्यात आले ही महाराष्ट्राची खरी संस्कृती आहे.
मात्र, राज्याच्या या संस्कृतीवर कोणी घात करत असेल तर चुकीचे आहे. असेही इम्तियाज जलील म्हणाले. दरम्यान, सरकारनामाद्वारे (Sarkarnama) आयोजित 'सरकारनामा ओपन माईक' हा कार्यक्रम सूरू असताना संध्याकाळी रमझानचा रोजा सोडण्याची वेळ झाली. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणीच नमाज अदा केली आणि रोजा सोडला.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.