Nashik : जीव धोक्यात घालून महिला भरत आहेत विहिरीतील पाणी, पहा VIDEO

नाशिकच्या रोहिले गावात जीव धोक्यात घालून महिला विहिरीतून पाणी भरत असतानाचा व्हिडिओ समोर झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
Nashik : जीव धोक्यात घालून महिला भरत आहेत विहिरीतील पाणी, पहा VIDEO
Nashik : जीव धोक्यात घालून महिला भरत आहेत विहिरीतील पाणी, पहा VIDEOSaamTVNews
Published On

नाशिक : उन्हाळा सुरू झाल्याने महाराष्ट्रात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील गावांमध्ये लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसून पाण्यासाठी (Water) वणवण सुरु आहे. नाशिकच्या (Nashik) अनेक गावातून भीतीदायक चित्र समोर येत आहे. विहिरीतून पाणी आणण्यासाठी महिला जीव धोक्यात घालत आहेत. पाण्यासाठी महिला विहिरीत जीवघेणी कसरत करत असल्याचा व्हिडीओ (Video) समोर आला आहे.

नाशिकच्या रोहिले (Rohile Village) गावात महिला विहिरीतून पाणी भरत असतानाचा व्हिडिओ समोर झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. विहिरीजवळ महिला आणि मुलांची गर्दी आहे. विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडी ठेवण्यात आली आहेत. विहिरीत (well) मुबलक प्रमाणात पाणी आहे, पण ते भरणे सोपे नाही. वास्तविक, कडक उन्हामुळे पाण्याची पातळी कमालीची खाली गेली आहे.

Nashik : जीव धोक्यात घालून महिला भरत आहेत विहिरीतील पाणी, पहा VIDEO
आंबेडकर जयंती मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन एकाचा खून!

पाणी काढण्यासाठी दोन महिला (Woman) दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरल्याचे दिसत आहे. वरून काही लोक प्लास्टिकचे डब्बे दोरीच्या साहाय्याने त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर पाण्यात शिडीवर उभ्या असलेल्या या महिला पाणी भरून वर आणत आहेत. हे अत्यंत धोकादायक आहे. थोडीशी चूक झाली तर या दोन्ही महिला पाण्यात पडू शकतात. पण पाण्यासाठी हे सगळे हतबल आहेत.

Nashik : जीव धोक्यात घालून महिला भरत आहेत विहिरीतील पाणी, पहा VIDEO
भाजप अध्यात्मिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षाला संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण

एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेशी बोलताना विहिरीतून पाणी आणणाऱ्या महिलांपैकी सोनाली नावाची महिला म्हणाली, 'स्त्रिया 2 किलोमीटर दूरवरून विहिरीतून पाणी आणण्यासाठी येतात. आमच्याकडे पाण्याची कमतरता आहे. तर, दहावीत शिकणारी प्रिया म्हणाली की तिला तिच्या कुटुंबासाठी पाणी आणण्यासाठी शाळा बुडवावी लागते. 'आमच्या गावात पाणी नाही. त्यामुळे आपण दूरच्या गावात पाणी आणायला जातो. कधीकधी यामुळे शाळेत जात येत नाही. या पाण्याच्या टंचाईमुळे मी दुसऱ्या गावातल्या विहिरीवरून पाणी आणायला गेलो असताना एकदा परीक्षेला उशीर झाला.

Nashik : जीव धोक्यात घालून महिला भरत आहेत विहिरीतील पाणी, पहा VIDEO
मी रामाला देव मानत नाही; माजी मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त विधान

पाटबंधारे विभागाच्या अभियंता अलका अहिराव यांच्या म्हणण्यानुसार यावेळी कमी पाणीटंचाई आहे. नाशिकमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पाण्याची स्थिती चांगली आहे. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयातून पाणी मागणी अहवाल घेतो आणि नंतर तो लोकांपर्यंत पोहोचवतो. येत्या जूनपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com