Amit Thackeray: अमित ठाकरे आमदार होणार? निमित्त वाढदिवसाचं, वेध विधानसभेचे?

MNS News: मनसे नेते अमित ठाकरे यांना आमदारकीचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. या चर्चेला कारण ठरलंय अमित ठाकरेंनी वाढदिवसाच्या दिवशी कापलेला केक. या केकवर विधानसभेचा फोटो असल्यानं अमित ठाकेरेंनी सूचक इशारा दिल्याचही बोललं जातंय.
अमित ठाकरे आमदार होणार? निमित्त वाढदिवसाचं, वेध विधानसभेचे?
Amit ThackeraySaam Tv

तन्मय टिल्लू, साम टीव्ही, प्रतिनिधी

मनसेनं राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यानंतर आता राज्यातील राजकारणात आणखी एका ठाकरेंची आगामी विधानसभा निवडणुकीत एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याला निमित्त ठरलंय अमित ठाकरेंनी कापलेला वाढदिवसाचा केक.

या केकवर चक्क विधानसभा आणि मंत्रालयाचा फोटो असल्याचं पाहायला मिळालंय. त्यामुळे उद्धव आणि आदित्य ठाकरेंनंतर राजकारणात आणखी एक ठाकरे आमदार होणार का याची चर्चा सुरू झालीये.

अमित ठाकरे आमदार होणार? निमित्त वाढदिवसाचं, वेध विधानसभेचे?
Lok Sabha Election: अबकी बार 400 पार कसं शक्य? काय आहे भाजपचा मेगा प्लॅन? महाराष्ट्रातील नुकसान कुठून भरुन निघणार?

अमित ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसैनिकांनी मध्यरात्रीच मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. मनसेचे चेंबूर विभागाचे विभाग अध्यक्ष माऊली थोरवे यांनी अमित ठाकरेंसाठी आणलेला केक चर्चेचा विषय ठरला. विधान भवन, मंत्रालय आणि लाल बत्तीची गाडी असलेला हा केक अमित ठाकरेंनी लवकर मंत्रालयात जावे, या शुभेच्छा देणारा होता. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांनी देखील हा केक कापून मनसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. अमित ठाकरे लोकसभा निवडणुकीत चांगलेच सक्रीय झाल्याचे दिसून आलेत. यातच आतापर्यंतचा अमित ठाकरेंचा राजकीय प्रवास जाणून घेऊ..

अमित ठाकरे आमदार होणार?

  • मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण

  • मनसेच्या विद्यार्थी सेनेचे प्रमुख म्हणून राजकारणात एन्ट्री

  • मुंबईसह पुण्यात विद्यार्थ्यांच्या विषयांना धरुन आंदोलनं

  • नाशिकच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंच्या नेतृत्त्वात मनसैनिकांकडून तोडफोड

  • लोकसभा निवडणुकीपासून संसदीय राजकारणात सक्रीय

  • आगामी विधानसभेत मैदानात उतरण्याचे सूचक संकेत

अमित ठाकरे आमदार होणार? निमित्त वाढदिवसाचं, वेध विधानसभेचे?
Pune Car Accident: मोठी बातमी! पुणे अपघात प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावेळी, राज ठाकरेंसमवेत अमित ठाकरेही भेटीसाठी हजर होते. या भेटीनंतर त्यांनी ग्रेटभेट असं कॅप्शन लिहून फोटोही शेअर केले होते. तर, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली. या सभेदरम्यान अमित ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या मुंबई महानगरपालिका आणि विधानसभेसाठी अमित ठाकरेंकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

मनसे पक्ष भोंग्याविरोधी आंदोलनामुळे चर्चेत होता तेंव्हा अमित ठाकरेंच्या वाढदिवसाला भोंग्याचं चित्र असलेला केक पहायला मिळाला होता. आता थेट कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंना विधानसभेत धाडण्याची तयारी केल्याचं दिसतंय. या शक्यता खऱ्या ठरतात का हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र असं झाल्यास विधानसभेतील चुरस आणखी वाढेल एवढं नक्की....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com