कमवत्या पत्नीलाही मिळणार पोटगी, पोटगीस नकार तर प्रॉपर्टी जप्त होणार; लाईफस्टाईल नुसार मिळणार पोटगी?

Bombay High Court : कमावत्या घटस्फोटीत महिलांना आता न्यायालयानं एक मोठा दिलासा दिलाय. पोटगीसंदर्भात घेतलेला निर्णय हा आता या महिलांसाठी मोठा आधार असणारे. काय नेमकं म्हटलंय, न्यायालयानं पाहूयात...
Alimony to earning wife
Alimony to earning wifeSaam Tv News
Published On

स्नेहील झणके, साम टिव्ही

मुंबई : पती पत्नीचं नातं म्हणजे लवचिक रबरासारखं खूप ताणलं गेलं आणि एकदा तुटलं की, पुन्हा जोडणं म्हणजे दिव्यच. पोटगीसंदर्भात न्यायालयानं दिलेला निर्णय हा नवरोबांसाठी टेन्शन वाढवणारा ठरलाय. तर अनेक विभक्त होऊ घातलेल्या महिलांसाठी आधार देणारा. पत्नी कमावते आहे म्हणून तिला तिच्या विभक्त पतीकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलाय. न्यायालयानं या प्रकरणात नेमकं काय म्हटलं पाहूया.

कमवत्या पत्नीलाही मिळणार पोटगी

दोन्ही पक्षांच्या उत्पन्न आणि मालमत्तेच्या तपशीलाद्वारे मिळणार पोटगी

पोटगीची रक्कम ठरवताना पूर्वीचे राहणीमान विचारात घेणार

मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजा यांचाही विचार होणार

पोटगी द्यायची आहे, त्याची आर्थिक क्षमता तपासणार

Alimony to earning wife
BMC : मुंबईत उंदीर घोटाळा? बीएमसीचा कोट्यवधींच्या निधीवर डल्ला? उंदीर मारण्याची मोहीम संशयाच्या घेऱ्यात

या मार्गदर्शक तत्त्वांचा उपयोग करुन न्यायालय आता घटस्फोटीतांना महिलांसाठी पोटगीची रक्कम ठरवणार. तिच्या राहणीमानानुसार तिला जगण्याचा अधिकार असल्यानं पोटगीची रक्कमही त्यानुसारच मिळणार आहे.

पत्नी कमावती असली तरी नोकरीसाठी तिला लांबचा प्रवास करावा लागत असेल तिच्यावर मुलांची जबाबदारी असेल आणि तिचं उत्पन्न तिच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे नसेल तर ती कमावती असून देखिल तिला पोटगीचा अधिकार असल्याचा निर्णय देऊन न्यायालयानं विभक्त महिलांना मोठा आधार दिलाय. यामुळे नात्यातील मंगळसूत्र जरी तुटलं तरी जबाबदारी पासून मात्र सुटका होणार नाही.

Alimony to earning wife
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना नाशिकमध्ये धक्का! ठाकरेंचे अनेक माजी नगरसेवक हाती घेणार 'धनुष्यबाण'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com