Singh Rajput Case: आदित्य ठाकरेंशी जोडला जातोय संबंध, ४४ कॉल करणारा AU कोण? रियानंच केला होता खुलासा, वाचा सविस्तर...

रिया चक्रवर्तीला ४४ कॉल करणारा AU नेमका कोण? अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
Nitesh Rane vs Aaditya Thackray
Nitesh Rane vs Aaditya Thackray Saam TV
Published On

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, तरी सुद्धा या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होत आहे. बुधवारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते राहुल शेवाळे यांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले. रिया चक्रवर्तीला AU म्हणून जे 44 कॉल आले होते ते आदित्य उद्धव ठाकरे यांचेच होते, असा दावा शेवाळेंनी केला. त्यानंतर आज भाजप आमदार नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी विधिमंडळात केली.  (Latest Marathi News)

Nitesh Rane vs Aaditya Thackray
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंना मोठा दिलासा; 'त्या' निर्णयावर हायकोर्टाने व्यक्त केलं समाधान

यावरून महाराष्ट्राच राजकारण चांगलंच तापलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले असून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी यावर आवाज उठवला आहे. त्यामुळे रिया चक्रवर्तीला ४४ कॉल करणारा AU नेमका कोण? अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. दरम्यान, रिया चक्रवर्ती हिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्वत: रिया चक्रवर्तीने AU कोण होता याबाबत खुलासा केलेला आहे.

काय म्हणाली होती रिया चक्रवर्ती?

सुशांतच्या मृत्यूपूर्वी रियाला जे कॉल आले होते, त्यासंदर्भात बिहार पोलिांच्या तपासात उल्लेख आहे. रियाला ते कॉल AU या नावाने आले होते, असे बिहार पोलिसांनी म्हटले होते. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) AU म्हणजे रियाची मैत्रिण अनया उदास असल्याचं म्हटलं होतं. रियाने देखील इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत AU नावाचा व्यक्ती दुसरा कुणी नसून ती माझी मैत्रीण अनया उदास असल्याचं सांगितलं होतं.

राहुल शेवाळेंचा आरोप काय?

मुंबई पोलिसांनी AU म्हणजे रियाची मैत्रिण अनया उदास असल्याचं म्हटलं होतं. मात्र, AU चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा आहे, सीबीआयने याबाबतची माहिती अद्याप लोकांसमोर आणलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाच्या तपासाची माहिती जनतेला मिळावी म्हणून मी हा मुद्दा आज लोकसभेत उपस्थित केला, असं राहुल शेवाळे म्हणाले होते.

Nitesh Rane vs Aaditya Thackray
Maharashtra Politics : अहो देवेंद्र भाऊ जरा बायकोला समजवा, नाहीतर.., काँग्रेसच्या महिला नेत्याचा इशारा

नितेश राणेंकडून नार्को टेस्टची मागणी

भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही सुद्धा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "जेव्हापासून सुशांत आणि दिशा सालियनचा मुद्दा काढला जातो तेव्हा आदित्य ठाकरेंचेच नाव का घेतले जाते. आज त्यांच्याच मंत्रीमंडळात असलेला खासदार याप्रकरणातील गंभीर गोष्टी सांगत आहे. जशी श्रद्धा वालकर प्रकरणात आफताबची नार्को टेस्ट केली होती तशीच आदित्य ठाकरेंचीही नार्को टेस्ट करा, अशी मागणी नितेश राणेंनी केली.

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, राहुल शेवाळे यांच्या या आरोपांना आदित्य ठाकरे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं.ते म्हणाले, मी एवढचं सांगेन की, Love You More. मुख्यमंत्र्यांवरुन वाचविण्याचा, राज्यपालांना वाचविण्याचा हा प्रयत्न असावा. ज्यांची निष्ठा घरात नसते, त्यांच्याकडून चांगलं अपेक्षित नाही. मला त्या घाणीत जायचं नाही. मी या व्यक्तीला काडीमात्र किंमत देत नाही.आता त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं हे मला माहित आहे. पण मला यात जायचं नाही. काय काय लोकांच्या खाजगी आयुष्यात मला डोकावायचं नाही. ते माझ्यावर संस्कार नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com